Search in Google

Thursday, December 12, 2019

युवादिन विशेष

अब्दुल कलाम म्हणाले होते, २०२० सालात भारत महासत्ता बनलेला असेल आणि आजचे तरुणच असा भारत घडवतील, परंतु आज तशी परस्थिती दिसत नाही. किंबहुना याउलटच आजचे चित्र आहे. रस्त्याने चालताना आपण जेव्हा एखाद्या तरुणाला श्रद्धांजली वाहील्याचा बॅनर पाहतो तेव्हा आपल्याही काळजाचा ठोका चुकतो. आज भारताची युवाशक्ती भरकटलेली दिसत आहे. अनेक तरुण दारू, गुटखा, सिगारेट  अशा अनेक व्यसनाच्या आहारी गेलेले आपणाला दिसतील. ढाब्यावर किंवा मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाऊन दारू पिणे प्रतिष्ठीत असते, असा गैरसमज तरुणांमध्ये सध्या रूढ होताना दिसत आहे. रस्त्याने गाडी चालवतानाही तरुणांचे रक्त जाम सळसळत असतं. आज अनेक अपघात होत असतानाही यातून बोध घेतला जात नाही.

क्रीडा, कला, साहित्य, व्यवसाय या क्षेत्रांत रुजू असलेल्या अनेक युवकांकडून अशा भरकटलेल्या तरुणांनी उर्जा प्रेरणा घ्यावी. क्रीडा क्षेत्रातून आपल्याला अशी बरीच नावे घेता येतील. नेहमीच क्रिकेटमध्ये अव्वल राहणारा धडाकेबाज फलंदाज आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, २०१८ मध्ये फिनलँडमध्ये वर्ल्ड ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी झालेल्या स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवणारी हेमा दास, २०१९ अशियन एथेटिक्स चॅम्पियनशिप मिळवणारी गोमती मारीमुथू.

विराट कोहली. या युवकाला कोण ओळखत नाही? याने आपला डंका जगभर वाजवला आहे? विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर, १९८८ रोजी दिल्लीतील उत्तम नगर मध्ये राहणाऱ्या एका पंजाबी कुटुंबात झाला. त्याचे वडील प्रेम कोहली व्यवसायाने एक वकील होते व आई सरोज कोहली ही गृहिणी आहेत. मेंदूच्या झटक्यामुळे एक महिना बिछान्यावर असलेल्या कोहलीच्या वडीलांचे १८ डिसेंबर २००६ रोजी निधन झाले. त्याच्या पूर्वायुष्याबद्दल बोलत असताना विराट सांगतो, "मी माझ्या आयुष्यात खूप काही पाहिलं आहे. लहान वयात माझ्या वडिलांचे निधन झाले, कौटुंबिक व्यापारही व्यवस्थित चालत नव्हता, आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. कुटुंबावर कठीण वेळा आल्या... हे सर्व मनावर खोल रुतून बसलं होतं." विराटने सांगितल्यानुसार त्याच्या लहानपणी त्याच्या वडिलांनी त्याच्या क्रिकेट प्रशिक्षणाला खूप पाठिंबा दिला होता. तो म्हणतो "माझे वडील हा माझा सर्वात मोठा आधार होता. ते नेहमी मला सरावासाठी घेऊन जात असत. अजूनही कधी कधी मला त्यांच्या सहवासाची आठवण येते." स्वतःला सावरत विराटने आपली जिद्द कायम ठेवली आहे. गल्ली क्रिकेटमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रशिक्षणासाठी  त्याने क्रिकेट क्लबमध्ये प्रवेश घेतला होता. क्रिकेट अकादमीमध्ये विराटने राजकुमार शर्मा यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. त्यावेळी नोयडा जवळच्या सुमित डोग्रा अकादमीकडूनही तो सामने खेळला. नववीमध्ये असताना क्रिकेट सरावासाठी मदत म्हणून त्याने दिल्लीतील पश्चिम विहार नावाच्या वसाहातीमधील सेव्हियर कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला.  खेळाशिवाय कोहली अभ्यासातही हुशार होता. त्याचे शिक्षक त्याला 'एक तेजस्वी आणि हुशार मुलगा' समजत. आज विराटची लौकिकता कुणाला सांगायची गरज नाही. विराट जगभरात गाजलेल्या सर्वच क्रिकेटपटुंचे रेकॉर्ड तोडत चालला आहे. आजच्या युवकांना क्रिकेटबरोबर प्रो-कब्बडी, कुस्ती लीग, ॲथलेटिक्सचे अनेक खुले पर्याय आहेत.

विराटबरोबर हिमा दासची प्रेरणादायी कहाणी आहे. हिमा दासचा जन्म आसाम राज्यातील नागाव जिल्ह्यातील धिंगजवळील कंधुलिमारी गावात झाला. तिचे वडील रणजित आणि आई जोनाली हे भातशेती करतात. ती चार भावंडांमध्ये सर्वांत लहान आहे. तिने धिंग पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले. आणि लहान वयात फुटबॉल खेळायला सुरुवात केली. ती आपल्या शाळेत मुलांबरोबर फुटबॉल खेळत असे. तिला फुटबॉलमध्ये कारकीर्द घडवायची होती. पुढे, जवाहर नवोदय विद्यालयाचे शारीरिक शिक्षण देणारे प्रशिक्षक श्यामशुल हक यांच्या सूचनेवरून हिमा दासने खेळ बदलला आणि धावपटू म्हणून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. ती कमी व मध्यम अंतराच्या शर्यतींमध्येच भाग घेत असे. श्यामशुल हक यांनी तिचा नागाव स्पोर्ट्‌स असोसिएशनच्या गौरीशंकर रॉय यांच्याशी परिचय करून दिला. हिमा दास नंतर आंतर-जिल्हा स्पर्धेसाठी पात्र ठरली आणि तिने या क्रीडा स्पर्धांत दोन सुवर्ण पदके जिंकली.  पुढे जुलै २०१८ मध्ये फिनलंड येथे झालेल्या २० वर्षांखालील जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत हिमा दासने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. ४०० मीटर धावण्यासाठी तिने केवळ ५१.४६ सेकंदांची वेळ घेतली. या कामगिरीमुळे ती अनेक अंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करू लागली.   तिच्या यशामुळे २०१८ मध्ये हिमाला भारत सरकारने अर्जुन पुरस्कार दिला. 

व्यवसायामध्ये जगभर लौकिकता मिळवणारे आजचे भारतीय तरुण संख्येने कमी असणे ही आपली शोकांतिका आहे. फ्लिपकार्ट चालू करणारे सचिन बनसल आणि बिन्नी बनसल, ओयो हॉटेल्सचा संस्थापक राजेश अग्रवाल, येवले अमृततुल्यचे नवनाथ येवले अशी काही नावे घेता येतील.
फ्लिपकार्ट कंपनीची स्थापना सचिन बनसल आणि बिन्नी बनसल या सॉफ्टवेअर इंजिनीअर असणाऱ्या दोघांनी सन २००७ मध्ये केली. फ्लिपकार्ट ही भारतातली एक अग्रणीय इ-कॉमर्स अथवा इलेक्ट्रॉनिक वाणिज्य कंपनी असून तिचे मुख्यालय बंगळूरू येथे आहे. वाचनाचं वेड असणाऱ्या या दोघांनी सुरुवातीच्या काळात आपले लक्ष विविध पुस्तके विकण्यात केंद्रित केले होते, परंतु आता फ्लिपकार्ट वेगवेगळी इलेक्ट्रॉनिक वस्तू व इतर दैनदिन वापरातल्या वस्तूंची विक्री करते. काही दिवसापूर्वीच फ्लिपकार्टचा वालमार्ट या कंपनीशी एकत्रित व्यवसाय करण्याचा करार झाला आहे. 

रितेश अग्रवाल. २०१२ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी याने ओयो हॉटेल्सची स्थापना केली. ज्याला ओयो होम्स आणि हॉटेल्स म्हणून देखील ओळखले जाते, ही एक भारतीय हॉटेल साखळी आहे. ही जगातील तिसर्‍या क्रमांकाची आणि भाड्याने घेतल्या जाणाऱ्या फ्रेंचाइज्ड हॉटेल्स, घरे किंवा  राहण्याच्या जागेची वेगवान वाढणारी आतिथ्य साखळी आहे.  सुरुवातीला भांडवलाची तडजोड करून ‘ऑरवेल स्टे’ उलाढाल वाढल्यानंतर ‘ओयो रूम्स अँड हॉटेल्स’ अशी नामांतरित करण्यात आली. आज कंपनीची किंमत १० अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. विविध देशात कंपनीची अनेक कार्यालये आहेत. हॉटेल व्यवस्थापन क्षेत्रातील अनेक अनेक कंपन्यांशी ‘ओयो’ करार करत आहे. असे १८ ते ३५ वयोगटातले अनेक नावाजलेले युवक आजच्या युवकांना खूप काही शिकवून जातात. ३२ वेगवेगळे व्यवसायाचे प्रयोग करून ३३ व्या प्रयोगात यशस्वी झालेले येवले अमृततुल्यचे नवनाथ येवले यांनीही आपला व्यावसाय विश्वव्यावी करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यांच्या आजच्या यशाचे कारण त्यांची मेहनत, चिकाटी इतर व्यवसाय यशस्वी का होतात हे पाहण्याची निरीक्षण क्षमता! बरिस्ता, सी.सी.डी. , डॉमिनोज पिझा, मॅकडोनाल्ड बर्गर  हे परदेशी व्यवसाय भारतात यशस्वी का झाले हेही आजच्या तरुणांना विचार करायला लावणारी गोष्ट आहे आणि आपली जिद्द कायम ठेवत युवकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवावा. 

 

विराट कोहली (कर्णधार- भारतीय क्रिकेट संघ, वय ३१ )

 












हिमा दास (वर्ल्ड ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियन वय २० )


 










सचिन बनसल आणि बिन्नी बनसल ( संस्थापक - फ्लिपकार्ट)



 









रितेश अग्रवाल ( संस्थापक - ओयो रूम्स अँड हॉटेल्सचे,  वय २५)  

Friday, November 29, 2019

What is Deep Learning ?


 What Is Deep Learning?

It's Nothing but AI and some kind of machine learning.

Deep learning is an artificial intelligence function that imitates the workings of the human brain in processing data and creating patterns for use in decision making. Deep learning is a subset of machine learning in artificial intelligence (AI) that has networks capable of learning unsupervised from data that is unstructured or unlabeled. Also known as deep neural learning or deep neural network. NLP has a major role in DL. (NLP - Natural language processing)

How Deep Learning Works?

Deep learning has evolved hand-in-hand with the digital era, which has brought about an explosion of data in all forms and from every region of the world. Deep Learning gives more accuracy and efficiency in AI.  This data, known simply as big data, is drawn from sources like social media, internet search engines, e-commerce platforms, and online cinemas, among others. This enormous amount of data is readily accessible and can be shared through fintech applications like cloud computing.


However, the data, which normally is unstructured, is so vast that it could take decades for humans to comprehend it and extract relevant information, to provide more efficiency. Companies realize the incredible potential that can result from unraveling this wealth of information and are increasingly adapting to AI systems for automated support.

Deep learning learns from vast amounts of unstructured data that could normally take humans decades to understand and process.

Deep Learning Versus Machine Learning

One of the most common AI techniques used for processing big data is machine learning, a self-adaptive algorithm that gets increasingly better analysis and patterns with experience or with newly added data.

In case, If a digital payments company wanted to detect the occurrence or potential for fraud in its system, it could employ machine learning tools for this purpose. The computational algorithm built into a computer model will process all transactions happening on the digital platform, find patterns in the data set and point out any anomaly detected by the pattern.

Deep learning, a subset of machine learning, utilizes a hierarchical level of artificial neural networks to carry out the process of machine learning. The artificial neural networks are built like the human brain, with neuron nodes connected together like a web. While traditional programs build analysis i.e. understanding with data in a linear way, the hierarchical function of deep learning systems enables machines to process data with a nonlinear approach.

A traditional approach to detecting fraud or money laundering might rely on the amount of transaction that ensues, while a deep learning nonlinear technique would include time, geographic location, IP address, type of retailer, and any other feature that is likely to point to fraudulent activity with more accuracy. The first layer of the neural network processes a raw data input like the amount of the transaction and passes it on to the next layer as output. The second layer processes the previous layer’s information by including additional information like the user's IP address and passes on its result.

The next layer takes the second layer’s information and includes raw data like geographic location & makes the machine’s pattern even better. This continues across all levels of the neuron network. DL is a very depth level of a machine learning concept. 

We will keep posting in upcoming blogs.. stay tuned with the site.

 

Monday, November 25, 2019

भविष्यातले तंत्रज्ञान - भाग ४ (IoT vs IIoT )

 आयओटी म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्ज हा बर्‍याचदा “स्मार्ट” ऑब्जेक्ट अर्थात सध्याच्या इलेकट्रीक गॅजेट्सला धरून संदर्भित केला जातो. उदा. कार, घरगुती उपकरणे ते शूज आणि लाईट स्विचपासून इंटरनेटशी कनेक्ट होणारी प्रत्येक  गोष्ट. डेटा पास करणे आणि प्राप्त करणे आणि भौतिक जगाला डिजिटल जगाशी जोडणारी प्रत्येक गोष्ट स्मार्ट ऑब्जेक्ट मानली जाते. परंतु आपणास माहित आहे की आयओटी व्याख्या स्पष्ट करण्यासाठी दोन संकल्पना वापरल्या आहेत?
वर नमूद केलेल्या आयओटी व्यतिरिक्त आयओओटी नावाची आणखी एक समान संकल्पना आहे, याचा अर्थ इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्ज आहे. दोन्ही संकल्पनांमध्ये त्यांची उपलब्धता, अचूकता आणि कनेक्ट केलेली डिव्हाइसची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. त्या दोनमधील फरक म्हणजे त्यांच्या आजच्या सामान्य तंत्रज्ञानात करून घेतलेला उपयोग! आयओटीचा वापर सर्वसाधारणपणे ग्राहकांच्या वापरासाठी केला जातो तर आयआयओटीचा उपयोग मॅन्युफॅक्चरिंग, सप्लाय चेन मॉनिटर आणि मॅनेजमेंट सिस्टमसारख्या औद्योगिक उद्देशाने केला जातो. खाली हे उदाहरण आपल्याला दोन्ही संकल्पनांबद्दल स्पष्ट चित्र देईल.


आयआयओटी विद्यमान उत्पादन आणि पुरवठा साखळी मॉनिटरचा विस्तार करण्यासाठी केला जातो, जसे कि विस्तृत, अधिक तपशीलवार दृश्यमानता आणि यात स्वयंचलित नियंत्रणे आणि कुशल विश्लेषक सक्षम करण्यासाठी अधिक अत्याधुनिक उपकरणे वापरली जातात.

दुसरीकडे, आयओटी ग्राहकांच्या सोयीसाठी स्मार्ट उपकरणे वापरण्याच्या संकल्पनेसह विकसित केली गेली असतात जेथे आपले काही फायदे मिळविण्यासाठी ग्राहक डिव्हाइसशी संवाद साधतात. उदाहरणार्थ, कनेक्ट केलेले घरगुती साधने आपले संसाधन वापर व्यवस्थापित करून आपले मासिक बिले कमी करतील, जसे की आपण घर सोडताना स्वयंचलितपणे वीज बंद होते किंवा वर्तमान हवामानाच्या आधारावर खोलीचे तापमान आपोआप ऍडजस्ट होते .


आयआयओटी अनेक महत्वपूर्ण मशीन हाताळण्यासाठी वास्तवात आणली गेलेली संकल्पना  असल्याने, आयआयओटीच्या यंत्रात अधिक संवेदनशील आणि अचूक सेन्सर वापरली जातात, ज्यात अत्याधुनिक, प्रगत नियंत्रण करणाऱ्या आणि परिस्थिती हाताळत विश्लेषण करणाऱ्या साखळीमय जागरूक तंत्रज्ञानाचा समावेश असतो. तथापि, त्याउलट, आयओटी जरासे कमी रिस्की असते. आयओटी डिव्हाइस आयआयओटीपेक्षा कमी खर्चासह स्थापित करता येते.  त्याची उत्पादन क्षमता आणि तंत्रज्ञानाची क्षमता वाढेल हे निश्चित नसते.

आयआयओटीत एरोस्पेस, डिफेन्स, हेल्थकेअर आणि उर्जा यासारख्या उच्च-उद्योगातील महत्वपूर्ण मशीन आणि सेन्सरला जोडले जाते. या अशा अनेक प्रणाली (प्रोग्रॅम्स) आहेत, ज्यात वारंवार अपयशाचा परिणाम जीवघेणा किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीवर  होत राहतो. तर, आयओटी अयशस्वी झाल्यास कमी जोखीम असते, अर्थात  परिणाम होणारी पातळी इतकी महत्वपूर्ण नसते.  त्यामुळे कोणताही गोंधळ उडत नाही.

जगभरात अनेक क्षेत्रात आयओटी तंत्रज्ञानाची अंमलबजावणी होत आहे. आयओटी आणि इंडस्ट्रियल आयओटी (आयआयओटी) मधील फरक समजून घेत असताना आपल्याला उदयोन्मुख औद्योगिक इंटरनेट व्यवसायाला नवीन वाढीची संधी कशी देईल आणि आपली कार्यक्षमता आणखी चांगल्या प्रकारे सुधारेल यावर आपल्याला अधिक चांगली काळजी घेणे गरजेचे आहे.

Wednesday, November 20, 2019

भविष्यातले तंत्रज्ञान - भाग ३

आता सध्या आपण आपल्या मोबाईलशी बोलून एकदा व्हिडीओ लावण्यासाठी, मेसेज पाठवण्यासाठी, कॉल करण्यासाठी सांगतो. अर्थात हेही आर्टीफिसिअल इंटीलिजन्स आहे. तुम्ही जर तुमच्या मोबाईलला एखादी गोष्ट सांगितली आणि ती नमूद करून ती मोबाईलने क्रिया पार पाडली कि ती मशीन लर्निंगची संकप्लना होते. समजा  तुम्ही जर मोबाईलला सांगितले "प्लिज नोट, मार्क इज माय डॅड." आणि काही दिवसांनी तुम्ही मोबाईलला सांगितले "प्लिज कॉल माय डॅड." तर तो बरोबर मार्कला फोन लावून देतो.

आजपर्यंत जितके शोध लागले आहेत,  भविष्यात होणाऱ्या संशोधनाला धरून हे शोध त्याच्या १ टक्केदेखील नाहीत.  आपल्याला विचारही करवत नाही, भविष्यात असे बरेच शोध लागतील. अर्थात माणूस विचार करतो म्हणजे नेमके काय करतो? माणसाच्या मेंदूत काहीतरी संकेत निर्माण होतात. वेगवेगळ्या मानवी विचारांची विशिष्ठ फ्रीक्वेसी असते. मेंदूशी संबंधित अनेक न्यूरॉन्स आणि मज्जातंतू संस्था शरीराला एक प्रकारचा सिग्नल पाठवत असते.  हेच सिग्नल्स घेऊन आर्टिफिशिअल इंटीलिजन्सची सुरुवात होते. एखादा व्यक्ती काय विचार करतो हेही आता समजू शकत आहे. डोक्यातून बाहेर पडणारी फ्रीक्वेसी पकडून एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करायची असल्यास तो केवळ विचार करून तो ती करू शकतो.


एखाद्या मूक-बधीर व्यक्तीसाठी हे तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त आहे. यात सिग्नल्स पकडण्यासाठी डोक्याला इलेक्ट्रोड्स लावले जातात. मेंदूवरील इलेक्ट्रोड्स संगणकाद्वारे बोलल्या जाणाऱ्या शब्दांमध्ये ब्रेनवेव्हचे भाषांतर करण्यासाठी वापरले जातात. जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपला मेंदू मोटर कॉर्टेक्सकडून आपला जबडा, ओठ आणि स्वरयंत्रात असलेल्या स्नायूंना त्यांच्या हालचालीत समन्वय साधण्यासाठी आणि ध्वनी निर्माण करण्यासाठी सिग्नल पाठवते.

सकारात्मक, नकारात्मक आणि असे लाखो विचारांचा सिग्नल्स पकडून डिकोड करणे ही गोष्ट खरी खूप आव्हात्मक असली तरीही हे सिद्ध करण्याचे अनेक प्रयोग होत आहेत, एका प्रयोगामध्ये या संशोधकाच्या पथकाने एका व्यक्तीला कोणतेही आवाज न बोलता त्यांचे तोंड हलवून बोलण्याची नक्कल करण्यास सांगितले आणि  ती यंत्रणा बोलल्या गेलेल्या शब्दांप्रमाणे कार्य करत नव्हती, परंतु तरीही ते गोंधळलेल्या शब्दांमधून काही समजण्यायोग्य शब्द डीकोड करत होती. आता असे तत्सम ऍलॉगरिथम्स तयार केले जात आहेत की ज्यातून मेंदूच्या सिग्नलला थेट ध्वनीमध्ये डीकोड करण्याचा प्रयत्न केला जाईल.

यातले मनुष्याचे ध्येय म्हणजे कसलेही दुष्परिणाम न होता सर्वसाधारणपणे मेंदू-प्रेरित संकल्पनांचा उपयोग करून कृत्रिम बुद्धिमत्ता वाढविणे हे आहे. याउलट, मेंदूचे विचार समजण्यासाठी किंवा त्यासाठी मदत करण्याकरता आम्हाला कृत्रिम बुद्धिमत्ताच वापरावी लागेल आणि याचा मूक-बधीर व्यक्तींना संपर्क साधण्यासाठी मोठा फायदा होईल.



Tuesday, November 19, 2019

भविष्यातले तंत्रज्ञान - भाग २

आर्टिफिशिअल इंटीलिजन्समुळे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. शिकण्यास असमर्थ असलेल्या विद्यार्थ्यांना अधिक प्रगत मजकूर शिकण्यात बर्‍याच वेळा त्रास होतो. काही अवघड संकल्पना समजून घेण्यास विध्यार्थ्यांना अडचणी येतात, शास्त्रज्ञ आणि संशोधक कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करीत आहेत ज्यामुळे हे कठोर मजकूर अधिक समजण्यायोग्य बनू शकेल.   शिक्षणासह किंवा अपंग असलेल्या विद्यार्थ्यांसह इतर शैक्षणिक कल्पनांना  चांगल्या प्रकारे संबंध जोडण्याचा आणि त्यास गुंतविण्याचा अभ्यासक्रम सोपा करून सांगण्याचा हा एक चांगला मार्ग होऊ शकतो.

शिक्षकांना अधिक प्रभावी चाचणी घेण्यास मदत करण्यासाठी नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली विकसित केल्या जात आहेत ज्यामुळे यापैकी बर्‍याचदा लपलेल्या परिस्थितीही आपल्यासमोर येऊ शकतात. ज्यामध्ये विद्यार्थ्यांची योग्य ओळख पटल्यास, शिक्षणासाठी असमर्थ अथवा मतिमंद विद्यार्थी असतील तर शिक्षक तेही ओळखू शकतात.  शिकण्यास असमर्थता असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सातत्याने त्यांचा अभिप्राय प्रदान करण्यात असमर्थता. मोठ्या वर्गामध्ये, मूठभर विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी शिक्षणाचा वेग कमी करणे हे एक आव्हान असू शकते. कृत्रिम बुद्धिमत्ता वेगाने विकसित होत असल्यास, विद्यार्थी त्यांच्या स्वत: च्या कामगिरीशी थेट संबंधित अधिक विश्वासात्मक अभिप्राय प्राप्त करू शकतात. विद्यार्थी एखाद्या संकल्पनेवर प्रभुत्व मिळवेपर्यंत यंत्रणा पुढे सरकनारच नाही आणि आवश्यकतेनुसार त्यांच्या स्वत: च्या गतीने शिकण्याची परवानगी अनुमती विद्यार्थ्यांना मिळू शकते.

शिक्षण क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटीलिजन्सच्या आगमनाने, शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या कमकुवतपणा ओळखण्यात मदत करणार्‍या विविध प्रकारच्या डेटावर पूर्वीपेक्षा जास्त वापर होऊ शकतो. हा डेटा अशी क्षेत्रे पकडू शकतो जिथे अध्यापन प्रभावी नाही किंवा बहुतेक विद्यार्थी संघर्ष करीत असलेले अवघड विषय आहेत. 

सध्याच्या  विद्यार्थ्यांमध्ये कुठेही, कधीही शिकण्याची क्षमता आहे. याचा अर्थ असा आहे की एखाद्या विद्यार्थ्याला वैयक्तिक किंवा इतर कोणत्याही कारणास्तव आपला अभ्यासक्रम बुडाल्यास, ते आर्टिफिशिअल इंटीलिजन्स शिक्षण सॉफ्टवेअरद्वारे ते सहज शिकू शकतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी किंवा शिक्षण आर्थिकदृष्ट्या प्रवेशयोग्य नसले किंवा परवडणारे नसले तरीही, विद्यार्थी उच्च शिक्षणाद्वारे जगातील कोठूनही शिकण्याची क्षमता देखील आर्टिफिशिअल इंटीलिजन्समध्ये आहे, याचा अवलंब भविष्यात वाढणार आहे .

शिक्षण क्षेत्रात झालेला हा बदल विलक्षण असेल. याद्वारे अनेक चांगले विद्यार्थी पुढे येतील. कृत्रिम शिक्षणाच्या मदतीने आपण विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे दोघांचे जीवन सोपे बनवू शकेल. कृत्रिम शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण घेण्याची संधी देईल आणि शिक्षणास आणखी मजबूत करेल.  




Monday, November 18, 2019

भविष्यातले तंत्रज्ञान - भाग १

 कोणताही देश भविष्यातही आपल्या संरक्षण दलात  उत्कृष्ठ दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर वाढवत आपली ताकद त्यावरच ठरणार आहे. पक्षाच्या रुपात हेरगिरी करणारे ड्रोन, इतर अचूक आणि बेधक मारा करणारे मिसाईल्स, रोबोटिक्स अशा आजच्या तंत्रज्ञानामध्ये बदलणाऱ्या दिवसाप्रमाणे यामध्येही बदल होत जाणार आहे. भविष्यातले ड्रोनसुद्धा खूप ताकतीचे असतील, युद्धकाळात कोणताही देश याची संख्याही जास्त ठेवील, पक्ष्यांच्या थव्याप्रमाणे हे शत्रुराष्ट्रावर तुटून पडतील. सैन्यादालामध्ये मणूष्यबळ नसून रोबोट काम करतील, युध्द करतील.

मोठमोठ्या हॉटेलमध्ये ग्राहकांना वेटरऐवजी रोबोट अन्नसेवा पोहच करतील. जपानसारख्या देशातील काही शाळांमध्ये मुलांची हजेरी घेण्यासाठी आजही 'आर्टिफिशिअल इंटीलिजन्स'सारख्या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे, यासाठी  उपकरणामध्ये विद्यार्थ्यांचा चेहरा ओळखण्याची अंमलबजावणी करण्यात आलेली असते.  एवढेच नव्हे तर लॉन्ड्रीत कपड्याच्या घड्या करण्यापासून खेळांमध्ये मुलांबरोबर बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल यांसारखे मैदानी खेळ खेळण्यासाठी रोबोट असतील यात दुमत नाही.

संरक्षण दल , वैद्यकीय, हॉटेल मॅनेजमेंट, क्रीडा  अशा अनेक क्षेत्रात 'आर्टिफिशिअल इंटीलिजन्स'सारख्या तंत्रज्ञानामुळे आजच्या कामाचा चेहरामोहरा बदलणार आहे. चीनमध्ये  काही दिवसापूर्वी पार पडलेल्या ब्रेन-ट्युमरच्या ऑपरेशनच्या चाचणीत मनुष्य डॉक्टरांच्यापेक्षा रोबोट डॉक्टरांची अचूकता जास्त होती.

आर्टिफिशिअल इंटीलिजन्समुळे सुरक्षेसंबंधी आकडेवारी देखील उल्लेखनीय असणार आहे. अशाप्रकारे, २०२०पर्यंत जगभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये जवळपास १ अब्ज आर्टिफिशिअल इंटीलिजन्सद्वारा समर्थित पाळत ठेवण्याचे कॅमेरे असणार आहेत. ऑनलाईन सुरक्षेबाबत AI टूल्सने अंदाजे ८६% वेगवेगळ्या सायबर हल्ल्यांना प्रतिबंधित करणे अपेक्षित आहे.

सध्याच्या डेटा विश्लेषणावरून असे कळते कि,
आर्टिफिशिअल इंटीलिजन्सद्वारे प्राप्त अंतर्दृष्टी वापरणारे व्यवसाय आणि जगाची अर्थव्यवस्था अनेक पटींनी पुढे जाण्याचा अंदाज आहे.

आर्टिफिशिअल इंटीलिजन्समुळे दैनंदीन जीवनात भेडसावणाऱ्या जगातल्या अनेक अडचणी दूर होणार आहेत, सेल्फ-ड्रिइविंग कारमुळे अपघात कमी होतील.  अपंग व्यक्तीचे जे ज्ञानेंद्रिय निकामी झालेले असेल त्याला पर्याय आर्टिफिशिअल इंटीलिजन्स असेल. आपण कल्पनाही करू शकत नाही, असे बदल या तंत्रज्ञानाच्या क्रांतीत घडून येणार आहेत. तथापि, आज जे दिसत आहे की आर्टिफिशिअल इंटीलिजन्स मुख्यत्वे संगणक विज्ञानच्या क्षमतांचा विस्तार करण्यासाठी डिझाइन केलेले आहे, त्यांची सीमा निश्चित करण्यासाठी नाही. परंतु खरा उद्देश असा नसून, वैज्ञानिकांसाठी पुढचे पाऊल म्हणजे सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात AIचा विस्तार करणे आहे. संशोधकांनामोरील एक महत्त्वाचे कार्य म्हणजे सध्या असलेल्या आर्टिफिशिअल इंटीलिजन्सचे दुष्परिणाम, असलेल्या अनेक अडचणी यावंर स्पष्ट सिद्धांताच्या सहाय्याने मात करणे, हे आहे.  



Thursday, October 31, 2019

दि पॉवरफूल गेम... - The Powerful Game ...



‘सामान्यांची फसवणूक करून दिलेला शब्द न पाळणारे भाजपचे सरकार घालविल्याशिवाय म्हातारा होणार नाही. मला या वयातही प्रचार सभा घ्याव्या लागत असल्याबद्दलचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे; पण त्यांना ठणकावून सांगतो की, मी अजूनही तरुण आहे. मी म्हातारा तर मुळीच नाही. या सरकारला घालविल्याशिवाय म्हातारा होण्याचा प्रश्नच नाही, मला अजून बऱ्याच जणांना घरी पाठवायचे आहे !’ प्रचार सभेत असे रोखठोक उत्तर देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर शरसंधान साधले होते.

२०१९ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधाऱ्यांकडून केवळ शरद पवारांनाच टार्गेट करण्यात येत होतं. जेव्हा जेव्हा मोदी-शहा प्रचारासाठी महाराष्ट्रात आले, शरद पवारांना टार्गेट केल्याशिवाय गेले नाहीत. जसे कि जे झाड लोकांना गोड आणि भरपूर फळे देते त्यालाच लोक जास्त दगडं मारतात. कारण महाराष्ट्रातून भाजप हटवण्याची जिद्द त्यांनी अनेक वेळा आपल्या भाषणांतून बोलून दाखवली होती.

डबघाईला आलेल्या काँग्रेसचं राज्यात अस्तित्व उरणार का? यावरही प्रश्नचिन्ह होतं. महायुतीचा आत्मविश्वास वाढत होता. मीडियानेही भाजप सत्तेत येणार अशा एक्झिट पोल्सच्या माध्यमातून धुमाकूळ घातला.  भाजपाचा आत्मविश्वास राज्यात पुन्हा महायुती २२० पार जाणार असं सांगत होता. सर्वांना लोकसभेच्या निवडणुकांसारखेच चित्र दिसत होते.  इतकचं नाही तर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले  सातारचे खासदार उदयनराजे भोसले हेदेखील पक्षाला रामराम करत भाजपात गेले. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई होती. मात्र ८० वर्षाचे शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात मागे हटायला तयार नव्हते. यातूनच पवारांकडे अनेक तरुणवर्ग आकर्षित झाला. संघर्षाची लढाई शरद पवारांनी जिद्दीने लढून राज्यात एक करिष्मा घडविला. विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ५४ जागा मिळाल्या.  अशा वातावरणात ५४ आकडा खूप मोठा ठरतो.  मागील निवडणुकीपेक्षा जास्त जागा विरोधी पक्षांना मिळतील असा विश्वास एकाही राजकीय विश्लेषकाला नव्हता. मात्र शरद पवार यांनी हा चमत्कार करुन दाखवला. काँग्रेस पक्षालाही त्यांनी संजीवनी दिली .

निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपात तणाव वाढला. महायुतीचे बहुमत सिद्द होत नव्हते. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद ही शिवसेना अडून राहिली होती. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद ही शिवसेनेची आग्रही मागणी भाजपाने फेटाळून लावली त्यामुळे या सत्तासंघर्षात शिवसेना-भाजपाचं आमचं ठरलंयपासून आमचं बिनसलंय असचं चित्र निर्माण झालं. भाजपला शिवशेनेशिवाय पर्याय नव्हता. भाजपाच्या घटलेल्या जागा पाहून शिवसेनेनेही आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला.  निकालानंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत इतर पर्याय खुले असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितले. दबावाचा भाग म्हणून संजय राऊतांनी अनेकदा शरद पवारांची भेटदेखील घेतली. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनेही आपला पॉवर गेम खेळला. भाजपाला गोंदळात टाकण्यासाठी शरद पवारांनी आम्हाला जनतेने विरोधी बाकांवर बसण्याचा कौल दिला आहे असं सांगत राहिले. मात्र भाजपाने सत्तास्थापनेस असमर्थता दाखविल्यानंतर अधिकृतरित्या शिवसेनेने आघाडीशी बोलणी सुरु केली. पटापट काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या बैठका चालू झाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन होऊन २० वर्षे झाली आहेत, १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत होता परंतु १५ ही वर्षे राष्ट्रवादी पक्षाने काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्यास सहमती दर्शवत, महत्वाची खाती स्वतःकडे ठेवली. आता शिवसेनेला पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेत येत आहे आणि यातून अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री तर  होणारच आहे याबरोबरच अडीच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल असे समीकरण तयार होत आहे. अर्थातच राष्ट्रवादीच्या इतिहासात  पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री होण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्रातील बारामतीतील काटेवाडी अशा  एका खेडेगवातून जन्माला आलेल्या शरद पवार या लोकनेत्याने आज देशातील सुज्ञ भारतीयांच्या मनात जिव्हाळा निर्माण केला आहे, हा जिव्हाळा विलक्षण आहे. आज शरद पवारांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण अपूर्ण आहे.. किंबहुना देशाचंही! खरे तर, साहेबांनी अंतरराष्ट्रिय निवडणूकही लढवली आहे आणि साहेब ती निवडणूक जिंकलेही आहेत, ती निवडणूक म्हणजे 'इंटरनॅशनल क्रिकेट कॉउंसिल'ची!

आम्ही लहानपणापासून शरद पवार नाव ऐकतच मोठे झालो आहोत. शरद पवार हे केवळ नाव नसून एक पुरोगामी विचार आहे, हे आम्ही आज अगदी जवळून पाहत आहोत. आम्ही आमच्या पुढच्या पिढ्यांना ही अभिमानाने सांगू की आम्ही एक शरद पवार नावाचा झंझावात पाहिला आहे. आम्ही साहेबांचा काळ पाहिला आहे... आम्ही राष्ट्रवादी नावाचे वादळ पाहिले आहे... यशवंतरावांनी तयार केलेला एक ऊर्जास्रोत आणि अनेक पैलवान घडवणारा वस्ताद पाहिला आहे..... 

आई - काळजाला भिडणारं पुस्तक - Book Review

जिच्यासारखे  कौतुके बोल नाही 
जिच्या यातनांना जगी तोड नाही 
नात्याचे त्या नाव असे आई 
आईएवढे कशालाच मोल नाही.. 

 
आईसाठी देवही कसे वेडेपिसे जाहले 
आईच्या दुधासाठी देव, राम कृष्ण जाहले       


आई हे पुस्तक कोणताही कवितासंग्रह नसून एक लेखसंग्रह आहे, परंतु या लेखांमध्ये येणाऱ्या अशा ओळी अंगावर काटा आणतात. लेखांमध्ये अनेक भावनिक प्रसंग आहेत.  प्रत्येक लेखात आईची महती तर आहेच आणि पुस्तक वाचताना डोळे पाण्याने भरले नाही तरच नवल! प्रत्येक लेख वाचकाच्या काळजाला भिडतो. जो व्यक्ती आपल्या आईला सांभाळत नाही किंवा आईकडे दुर्लक्ष करतो, पुस्तक वाचून अशा अनेकांचे आईबद्दलचे मत परिवर्तन झाले आहे, असे अभिप्राय प्रकाशन संस्थेला आले आहेत. पुस्तक वाचताना मीही अक्षरशः रडलो.  

एक महान दैवत, वात्सल्याचा अप्रतिम अविष्कार, थोर तुझे उपकार, स्वामी तिन्ही जगाचा, ज्याला नाही आय त्याला काय न्हाय, संस्कार करणारे देवाचे रूप...  पुस्तकात असे अनेक एक से बढकर एक लेख आहेत.  तसेच देशभक्ताच्या दृष्टीने पहात भारतमातेवर भाष्य करणारे, शेतकऱ्याची  धरणीमातेबद्दलची भावना मांडणारे असे अनेक हृदयस्पर्शी लेख वाचताना वाचक भावनिक होतो. 

साने गुरुजींचे 'शयामची आई' या पुस्तकाच्या तोडीचे हे पुस्तक आहे. कवितांच्या ओळींमुळे लेख अधिकच प्रभावशाली झाले आहेत. महाविद्यालयीन, शाळेतील विद्यार्थ्यांना निबंधलेखनासाठीच्या ज्ञानात भर घालण्याच्या हेतूने आणि अर्थात सर्वांनाच आवडेल असे लेखकाने आईविषयी भरभरून लिहिले आहे.    

सत्ययुगाच्या अखेर झाली 
प्रेम आणि द्वेषाची लढाई 
द्वेष जाहला विजयी आणि 
प्रेम लपे आईच्या हृदयी !!  

पुस्तक : आई 
लेखक  : द. गो. शिर्के 
प्रकाशक : चपराक प्रकाशन 
किंमत : १०० /-
खरेदीसाठी लिंक : Click here.. 
संपर्क : 7057292092   
 


Tuesday, October 22, 2019

यशस्वी जीवनाचे व्यवस्थापन - पुस्तक समीक्षण - Best Time Management book




लेखक रवींद्र कामठे यांच्या ‘तारेवरची कसरत’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेच्या निमित्ताने मागच्या आठवड्यामध्ये जेष्ठ आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांची भेट झाली. पहिल्या भेटीतच मी खूप भारावून गेलो. शेजवलकर सरांना अनेक जीवनगौरव पुरस्कार, साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार, व्यवस्थापन क्षेत्रातील पुरस्कार, अनेक फौंडेशनचे, बँकांचे पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. सर्वच क्षेत्रात सरांचे योगदान बहुमोल आहे. आज सरांचे वय ९२ वर्षे आहे, परंतु अनेक तरुणांना लाजवेल असे आजही त्यांचे कार्य आहे. खरं तर, आपल्या शब्दांतून डॉ. प्र. चिं. शेजळकर लिहिणे म्हणजे ओंजळीने हिमालय भिजवल्यासारखे आहे.

डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांची भेट झाली तेव्हा त्यांचे ‘यशस्वी जीवनाचे व्यवस्थापन’ हे पुस्तक हाती पडले.
घरी परतताच वाचायला सुरुवात केली. वाचताना शेजवलकर सर माझ्याशी जणू संवाद साधत आहेत असे काहीसे भासले. व्यवस्थापनामधील अनेक लहानमोठ्या गोष्टी या पुस्तकात अतिशय विस्तारित रूपाने  मांडल्या आहेत, बरोबरच सामान्य माणूस उद्योगधंद्यात का मागे पडतो आणि उद्योगधंद्यात येणाऱ्या अडचणींना कसे सामोरे जावे, हे शेजवलकरांनी अतिशय सोप्या भाषेत मांडले आहे. यशस्वी व्यवस्थापनासाठी आपले मुलभूत विचार काय असायला हवेत? आपल्या जीवनात व्यवस्थापनेची महती कितपत योगदानाची आहे? खरे तर,  व्यवस्थापन हे कोणते विज्ञान किंवा तंत्रज्ञान नसून एक कौशल्य आहे, त्याला नियोजनाची आणि संयोजनाची जोड असावी लागते. आपल्या कार्याक्षतेच्या जोडीला नीटनीटकेपणा असायला हवा. आपल्या अपयशाला कधी आपले अपुरे ज्ञानही कारणीभूत असते, त्यासाठी अनुभवातून आलेल्या माहिती बरोबर इतर माहिती ज्ञात करून घेणे, हे या पातळीपर्यंत कि आपल्या कार्यासंबधी कोणताही प्रश्न विचारला असता तोंडून कधी ‘मला माहित नाही’ असे उत्तर यायला नको. पुस्तकात अशा गोष्टीवर सोप्या शब्दांत भाष्य केले आहे.

पुस्तकाच्या सुरुवातीलाच ढोंगीपणा, गाफिलपणा किंबहुना लाचारी किती पसरली आहे हे सांगितले आहे..

पगार वाढतोय, काम घोरतंय, थापेबाजीला ऊत येतोय..
अर्धवट शहाणपणापुढे जग मान तुकवतंय...
आत्मस्तुतीत गुरफटले आहेत अहंकारी बुद्धिवंत !
ढोंगीबाजी करतंय उथळ नेतृत्व,
निर्लज्ज करताहेत अतोनात उपद्व्याप...
अधिकारी झाले आहेत बहिरे, अनुयायी झाले आहेत ‘होयबारे’
बहुसंख्य बसले आहेत डोळ्यावर कातडे पांघरून
तज्ञ आहेत पण क्रियाशून्य !
येते संधी ... आणि जाते निघून....


या सर्व गोष्टींबरोबर वेळेचेही  महत्व या पुस्तकात पटवून दिले आहे. आपला वागणुकीतील शिष्टाचार, तारताम्यता, आपला आत्मविश्वास, सभोवतालचे वातावरण, आरोग्य, आहार  या गोष्टीवर देखील या पुस्तकातून मार्गदर्शन केले आहे. ईच्छाशक्तीच्या जोरावर माणूस काय करू शकतो हे उदाहरणासह स्पष्ट केले आहे, गाथा उद्योजकतेची वाचताना आपला आत्मविश्वास वाढला नाही, तरच नवल! दुकानदार आणि ग्राहक यांच्यातील संभाषणापासून त्यांच्यात होणारा पैशाच्या व्यवहार कसा करावा याचेही छान वर्णन केले आहे. हाताखालच्या माणसांकडून कामे कशी करून घ्यावी? सुसंवाद कसा साधावा ? किंबहुना समोरच्या व्यक्तीचे लक्षपूर्वक कसे ऐकावे ? पैसा खर्च करण्याची कला कशी अवगत करावी ? मराठी माणूस उद्योगात मागे का ? पात्रता असूनही यश का मिळत नाही?  अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात दडली आहेत. काही गोष्टी आपल्याला क्षुल्लक वाटत असतात परंतु आपल्या यशस्वी जीवनासाठी त्या खूप महत्वाच्या असतात. रागावण्याची वेळ आली कि आपली होणारी हतबलता आणि आपण  त्यावेळी काय केले पाहिजे कसे वागले पाहिजे ? शिस्तीची आधुनिक संकल्पनाही शेजळकरांनी अगदी सोप्या शब्दांत मांडली आहे.

यशस्वी उद्योजक होण्यासाठी आपली चिकाटी, धडपड बरोबरच आपली दूरदृष्टीही महत्वाची असते. व्यवस्थापकीय प्रश्नांचा केंद्रबिंदू शेवटी आपण सर्व माणसेच असतो. आपले अनुभव, विचार करण्याचे कौशल्य, निर्णय कौशल्य या सर्व गोष्टी शिकणे... यश मिळवण्यासाठी गरजेच्या ठरतात. निर्णय घेता न येणे यासारखा दुसरा दोष नाही. निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचे निर्णय घेतलेले अधिक बरे... कारण चुकीचे निर्णय घेणाऱ्या माणसांनीही जीवनात यश मिळवले आहे. परंतु जो निर्णय घेवू शकत नाही, ज्याचे मन नेहमी गोंधळात असते, असा मनुष्य कधीच यशस्वी झालेला आपण ऐकले नाही, अशा अनेक गोष्टींवर या पुस्तकात प्रकाश टाकला आहे.

माणसाने कसे असावे? कसे नसावे ? काटकसर कोठे करावी ? बोलताना, ऐकताना संयम राखावा, सहकाऱ्याला विश्वासात घेवून सहकाऱ्यांची चूक कशी लक्षात आणून द्यावी अशा अनेक गोष्टीवर शेजळकरांनी वाचकांशी संवाद साधला आहे.  कोणताही माणूस त्याच्या जीवनात किंवा व्यवसायात यशस्वी कसा होतो हे शोधणे थोडेसे कठीण जरी असले तरी त्यामागचे रहस्य माहिती करू घेणे गरजेचे असते. ‘Action speaks louder than words’  हे समीकरणही अगदी खरे आहे. मी ठामपणे सांगतो कि ज्याला यशस्वी होण्याकरता आपल्या जीवनाचे अचूक व्यवस्थापन करायचे असेल अशा प्रत्यकाने हे पुस्तक आवरजून वाचावे.



Thursday, October 10, 2019

शोधक - नवे पुस्तक

मला मनाला जरा वेगळं वाटलेलं कागदावर उतरवण्याची आवड मी शाळेत असल्यापासूनची. आज त्याला आणखी वेगळं रूप मिळालेलं आहे. मला वाटलंही नव्हतं कधी, ते पुस्तक रूपात अवतरेल म्हणून! पण हे शक्य होत आहे 'साहित्य चपराकमुळे'! 

चपराकचे संपादक घनश्याम पाटील यांनी माझे काही लेख साप्ताहिकात आणि मासिकात प्रकशित केले आहेत आणि यामुळेच माझ्या लेखनाला हे एक भक्कम व्यसपीठ मिळालं. माझ्या काही कविता मी एकदा संपादकांना दाखवल्या. त्यांनी त्या वाचल्या आणि क्षणात सांगितले की आपण याचे पुस्तक करू शकतो आणि काही दिवसातच जन्म झाला विचारांनी जड असणाऱ्या या माझ्या शब्दाच्या गाठोड्याचा!!



Thursday, August 29, 2019

शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान

भारत कृषीप्रधान देश आहे. आज देशाची आर्थिक मंदीचे सावट असताना आपण औद्योगिकरणासंबंधी आणि शेतीविषयक आर्थिक धोरणे हाताळण्यात अपयशी पडलो, हे स्पष्ट आहे. शेतकऱ्यांबद्दल कायमच सर्व वर्गात सहानभुतीची भावना असते. परंतु, शेतीपूरक आर्थिक धोरणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर या अनुषंगाने बदल झाले तरच शेतीतील उत्पन्न वाढेल, भारत अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपला ठसा उमटवेल आणि भारतीय शेतकरी मोठा होईल, हेही स्पष्ट आहे. 

भारतीय कृषी उद्योग विकसित करण्यात तंत्रज्ञानाची मोठी भूमिका आहे. आज शेती जैव-तंत्रज्ञानाचा उपयोग करून वाळवंटात पिके उगवणे शक्य होत आहे. या तंत्रज्ञानाद्वारे, दुष्काळ परिस्थितीत जगण्यासाठी वनस्पतींचे इंजिनियरिंग करण्यात आले आहे. अनेक शास्त्रज्ञ अनुवंशिक अभियांत्रिकीद्वारे दुष्काळ आणि कीटकांना प्रतिरोधक बनविण्याच्या उद्दीष्टाने वनस्पतीतील घटकांमधील अद्वितीय वैशिष्ट्ये ओळखू शकलेले आहेत. इथं असे एक उदाहरण देता येईल, “बॅसिलस थुरिंगिन्सिस” नावाचे एक बॅक्टेरियम साठ्यासारखे कार्य करते, यामुळे पिकांना कीटक-प्रतिरोधक होण्यास सक्षम करते, म्हणून ही अनुवांशिकरित्या सुधारित पिके कीटकांच्या हस्तक्षेपाशिवाय वाढू शकतात. या तंत्रज्ञानाचा शोध विकसनशील देशांमध्ये कापसासारख्या नगदी पिके घेण्यासाठी वापरला जात आहे, कारण या अनुवांशिक अभियांत्रिकीकृत सूती रोपे कीटक प्रतिरोधक असल्याने सामान्य कापूस लागवड केलेल्या वनस्पतींपेक्षा ती चांगली वाढतात व त्यामुळे चांगले परिणाम मिळतात.

गेल्या शतकात कृषी यंत्रांचे मूलभूत तंत्रज्ञान थोडेसे बदलले आहे. ट्रॅक्टरमध्ये आणि इतर उपकरनामध्ये कापणी, धान्य वेगळे करण्यासाठी किंवा मळणीसाठी संगणकिय मॉनिटरिंग सिस्टम, जीपीएस लोकेटर, सेल्फ-स्टीयर प्रोग्राम्स किंवा सेन्सर स्थापित करून वापरण्यास सुरुवात झाली आहे. तंत्रज्ञानाने बियाणे किंवा खतांच्या वापरामध्ये अधिक तंतोतंतता आणण्यास मशीन्स ऑपरेट करण्याच्या पद्धतीत बदलत होत आहेत. भविष्यात जीपीएस नकाशे आणि इलेक्ट्रॉनिक सेन्सर वापरुन काही कृषी मशीन्स स्वयंचलीत करण्यास आणखी सक्षम केल्या जाऊ शकतील. यापेक्षाही विलक्षण म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी आणि अनुवांशिक अभियांत्रिकीची नवीन क्षेत्रे, जिथे अनुक्रमे सब-मायक्रोस्कोपिक उपकरणे आणि जैविक प्रक्रिया नवीन आणि विविध मार्गांनी कृषीकार्य करण्यासाठी वापरली जाऊ शकते.

शेतात आलेलं गवत किती आहे हे मोजण्यासाठी इंग्लंडमधील शेतकरी मोबाईल अ‍ॅप्सचा उपयोग करतात. इंग्लंड, स्कॉटलंड यासारख्या देशांमध्ये सध्या ‘फार्मग्रेज’ हे मोबाईल अ‍ॅप धुमाकूळ घालत आहे. आज रशियातील शेतकरी मोठ्या पिकावरील फवारणीसाठी ड्रोनचा वापर करतात. यामुळे शेतकर्‍याचा वेळ आणि पैशाची बचत होते,  मोबाईलवरच त्यांच्या जनावरांना काय खायला पाहिजे हे त्यांना कळते. सिंचन पाणी, खते आणि कीटकनाशकांच्या वापरामध्ये तंत्रज्ञानाचा वापर होतो. आधुनिक शेती तंत्रज्ञान म्हणजेच प्रायोगिक खाद्य रसायनशास्त्र, प्रायोगिक मत्स्यपालन व पशुधन उत्पादन, अन्न व औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र, सिनेशिया ई-अ‍ॅग्रोटेक्नोलॉजीया, वनस्पती पॅथॉलॉजी, अ‍ॅग्रोइकोसिस्टममध्ये पौष्टिक सायकलिंग, मातीचा वापर आणि व्यवस्थापन यांचे संबंधित जर्नल्स होय.
 
स्मार्टफोनच्या वाढत्या प्रमाणामुळे शेतकऱ्यांसाठी नवे पर्याय खुले होत आहेत. या परिवर्तनाला आपण फार्मिंग ३.० म्हणतो. १९६०च्या मध्यापर्यंत चाललेल्या फार्मिंग १.०. याचे मुख्य वैशिष्ट्य जमीनविषयक सुधारणा हे होते. दुसरा टप्पा किंवा फार्मिंग २.० ची सुरुवात १९६०मध्ये झाली व त्याचे उद्दिष्ट भारताला अन्नाच्या बाबतीत सुरक्षित करणे हे होते. त्यातून ट्रॅक्‍टर, बियाण्यांचे अनेक प्रकार, जलसिंचन मिळाले, आता नेमकेपणाने शेती करणे ही काळाची गरज बनणार आहे. ही क्रांती प्रत्यक्षात आणण्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. फार्मिंग ३.० शेतीचा सात-बारा उताराही मोबाईलवर मिळतो आहे, त्याला काही दिवसांनी गूगल- मॅपसारखे लाईव्ह मॅपही जोडलेले असेल.

भारतातील शेतीसाठी सध्या बदलतं हवामान हा प्रमुख अडथळा आहे असं म्हणायला हरकत नाही. ऊर्जानिर्मितीसाठी अधिकाधिक नैसर्गिक साधनं अर्थात सौर आणि वायुऊर्जा वाढवण्यासाठी तंत्रज्ञानावर भरही दिला गेला पाहिजे. हवामान बदलामुळे भविष्यात पाण्याचं दुर्भिक्ष वाढणार असल्याने पाण्याचं संतुलित संवर्धन करणं आणि त्यासाठी पर्याय शोधणं यावर अधिक भर दिला पाहिजे. यासाठी हवामान खातं अनेक कृत्रिम उपग्रहांच्या माध्यमानं त्यातील कार्यक्षमता वाढवत आहे.  शेतकर्‍यांकडून तंत्रज्ञान स्वीकारणे ही देशासाठी एक प्रकारची गुंतवणूकच आहे. मुख्यत: कृषीतील नावीन्य विकसित आणि आपली ओळख उमटवन्याच्या प्रक्रियेमध्ये आर्थिक आणि पर्यावरणीय घटक महत्वाचे ठरतात. तंत्रज्ञानाने शेतीला वास्तविक व्यवसाय बनविले आहे, आता शेतकर्‍यांनीही  प्रत्येक प्रक्रियेचे विद्युतीकरण केले आहे, ग्राहक थेट ऑनलाईन ऑर्डर देऊ शकतो आणि हे प्रमाण वाढण्यासाठी आजच्या नव्या रक्ताच्या शेतकरीवर्गाने आधुनिक तंत्रज्ञान शिकले पाहिजे, अवलंबले पाहिजे. खरे तर, पूर्वीचीच ही शेती आहे, शेती हा सर्वात जुना व्यवसाय आहे परंतु शेतीचे स्वरूप बदलत चाललं आहे. शेतीतील श्रमिकांऐवजी आता यंत्रमानव शेतीतील कामे करू लागले आहेत. यावरून पुढचा प्रश्न असा उभा ठाकतो कि शेतीवरील अवलंबून असलेल्या अनेक रोजगाराचे काय? अर्थात शेतीतील मजुरांनाही नवीन तंत्रज्ञान शिकावं लागेल. शेवटी अर्थव्यवस्था चालते ती मानवी गरजांवर. गरजा सातत्याने बदलत आलेल्या आहेत. अगदी जागतिकीकरणाआधी आपल्या ज्या गरजा होत्या त्यात आणि आजच्या गरजांत जमीन अस्मानाचा फरक आपल्याला जाणवत आहे. सध्या अनेक प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाची भारतीय शेतीला गरज आहे आणि यातूनच भविष्यातील शेतीचे चित्र बदलण्यास मदत होणार आहे.

Tuesday, July 23, 2019

आर्यांची दिनचर्या : जगण्याला दिशा देणारे पुस्तक - Book Review

या वर्षात मी अनेक पुस्तके वाचली. त्यातच 'आर्यांची दिनचर्या' हे पुस्तक हाती पडलं. एकदा हातात घेतलं आणि कधी वाचून संपलं समजलंही नाही आणि जवळ एक-दीड वर्षांनी मला एखाद्या पुस्तकाचं समीक्षण करावसं वाटलं. खरं तर हे पुस्तक नसून निरोगी आणि सुखी जीवन जगण्याचा मूलमंत्र आहे. आपले सर्वात मोठं धन म्हणजे 'आपले आरोग्य' होय. आरोग्य आहे तर सर्व काही आहे आणि हे आरोग्य जपण्यासाठी आपल्याला काही फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. सर्व उपाय आपल्याजवळच असतात. अर्थात  निरामय आरोग्य व समृद्ध चौफेर जीवन जगण्यासाठी दिशा देणारे हा ग्रंथ आहे.

सामाजिक आरोग्याच्या सुदृढतेचा विचार करून या ग्रंथाची मांडणी झाली आहे. आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे. पोषण, आहार, व्यायाम, स्वच्छता, इतरांशी व्यक्तिगत संबंध या गोष्टी आरोग्यावर परिणाम करतात. एखादा आजार होऊन बरा करण्यापेक्षा तो होवूच नये याची उपाययोजना यात सांगितली आहे.

आपल्या दिनचर्येबरोबर सामान्य औषधी उपचार, निसर्गोपचार, वनस्पती, गुणधर्म, मुळव्याध, अग्निमांद्य, दमा, सामान्य ज्वर, नेत्ररोग, त्वचारोग, कर्णरोग, दंतरोग व स्त्रीरोग यांची चिकित्सा ईत्यादी विषयांवर स्वनुभाविक व सुलभ औषधयोजनांची पुस्तकातील माहिती अतिशय उपयुक्त आहे. मी या पुस्तकाला केवळ  'घराचा वैद्य' अजिबात बोलणार नाही कारण हे पुस्तकात फक्त उपचार सांगितले नाहित तर जगण्याची सकारात्मकता दाखवत वाचकांना प्रोत्साहित करते. यात अनेक लोकांचे अनुभव आहेत. काही लोकांचे तर आजार बरे होणे शक्य नव्हते असेही अनेक आजार कीर्तनकार ह. भ. प. डॉ. दत्तोपंतबुवा पटवर्धन यांनी बरे केले आहेत.

गरोदर असताना स्त्रियांनी काय काळजी घ्यावी, दुध येण्यासाठी काय काळजी घ्यावी. यात विद्यार्थी, वृद्ध, तरुण, स्त्रिया आशा सर्वच गटातील लोकांसाठी उपयुक्त माहिती आहे. शारीरिक व्याधीचे नैसर्गिक आणि साधेपणाने उपचार कसे करावेत याबाबतचे अनुभवजन्य विश्लेषण बुवांनी या पुस्तकाच्या माध्यमातून अत्यंत साध्या, सोप्या भाषेत केले आहे.

या पुस्तकातले अनेक आचार म्हणजे दिनचर्या. दैनंदिन व्यवहारात मनुष्याने वागावे कसे ? प्रत:काळी उठल्यापासून रात्री निद्रा घेईपर्यंतचे जीवन कसे घालवावे हे आचाराच्या धार्मिक चौकटीत बसवून दिलेले आहे परंतु हे आचार आपले जीवनसैख्य, आयुष्य, बल, तेज वाढविणार कसे आहेतयाचे तरुणांनी ज्ञान करून घेतले तर आपल्या जुन्या आचारासंबधी झालेले गैरसमज दूर होऊन त्याप्रमाणे वागणारा दीर्घायू, तेजस्वी आणि सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. हे या पुस्तकात सांगितले आहे. 

वाई येथील आद्य राष्ट्रीय कीर्तनकार आणि लेखक ह. भ. प. डॉ. दत्तोपंतबुवा पटवर्धन यांचे वाचनीय आणि अनुकरणीय पुस्तक. १९५६ नंतर या या पुस्तकाची गरज का पडते आहे हे चपराकने ओळखले आणि हे पुस्तक पुन्हा प्रकाशित केले आहे. सर्वांनी हे पुस्तक वाचून आपले जीवनशैली निरोगी आणि सकारात्मक उर्जेने भरून जगावे.

पुस्तक : आर्यांची दिनचर्या
लेखक : ह. भ. प. डॉ. दत्तोपंतबुवा पटवर्धन
प्रकाशक : चपराक प्रकाशन
संपादन : दिलीप कस्तुरे
किंमत : २०० रुपये.
या पुस्तकाच्या नोंदणीसाठी संपर्क: ‭7057292092
http://shop.chaprak.com/product/aryanchi-dincharya/

Saturday, July 6, 2019

5G इंटरनेटची दुसरी बाजू

इंटरनेटविषयीचे तंत्रज्ञान जोर घेत असताना, आता 4G नंतर 5G जीचा धुमाकूळ वाढणार आहे. 5G नेटवर्कमध्ये भरपूर युझर कनेक्टीविटी असूनही इंटरनेट सेवा फास्ट असणार आहे. वाहतूक, दळणवळण, खाजगी व्यवसाय, सरकारी कामे, स्मार्ट सिटी अशा सर्वच ठीकाणी सर्व कामे वेगाने होतील.    टरनेटला आता 5G मध्ये नेण्याची तयारी सुरू झाली आहे. या नवीन वायरलेस सेल्युलर तंत्रज्ञानामुळे आजच्या तुलनेत इंटरनेटचा वेग अनेकपटीने वाढणार आहे. कोणतेही इंटरनेटयुक्त उपकरण चालवणे अधिक सोपे होईल. थोडक्यात, स्मार्टफोनवर गेम कोणताही व्यत्यय न येता खेळू शकाल. ट्रॅफिकमध्ये बदल झाल्यास ऑटोनॉमस  व्हेइकल त्वरित प्रतिक्रिया देईल. यामुळे स्मार्ट होम जास्त स्मार्ट होईल. 

अमेरिकेत या २०१९ अखेरपर्यंत 5G फोन  बाजारात येतील. परंतु त्यासाठी सध्या 5G नेटवर्क कमी प्रमाणात आहे. सध्या जे 5G नेटवर्क आहे ते टेस्टिंग आहे. परंतु 5G च्या सेवा देवू पाहणाऱ्या दूरसंचार कंपन्यांना हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्समिशनसाठी सेल्युलर उपकरण आणावे लागतील. त्यासाठी खर्च खूप असणार आहे. रेडीओ व अन्य तरंगांचे उपकरण सिग्नल इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमवर चालतात. परंतु 5G साठी कंपन्यांना आधीच्या तुलनेत अधिक जास्त स्पेक्ट्रमचा वापर करावा लागेल. दुसरीकडे अमेरिकन सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, 5G उपकरणाचे प्रमुख निर्माते चीनमधील हुवावे, जेडटीई कंपनी विदेशातील युजरला देखरेख करण्याची परवानगी देऊ शकतात. परंतु आजवर आपण पाहिलेले आहे की विज्ञानाच्या प्रत्येक संशोधनाला दोन बाजू आहेत. अमेरिकन फोन कंपन्यांना उपकरण देण्यास कंपन्यांना नुकतीच बंदी घातली आहे. बरोबरच 5G त्रुटींवर संशोधन सुरु आहे. 

जवळजवळ ४० देशांमधले १८० पेक्षा जास्त वैज्ञानिक आणि डॉक्टर 5G मुळे  पृथ्वीवरील जीव सृष्ठीला धोका असल्याचे सांगतात. या संबधीचा ठराव या शास्त्रज्ञांनी "रीझोलूशन १८१५ ऑफ दी कौंसील ऑफ युरोप" या युरोपच्या परिषदेत मांडला होता. या परिषदेत मानवी आरोग्यासाठी संभाव्य धोके आणि वैज्ञानिकांद्वारे पर्यावरणासाठी संपूर्णपणे स्वतंत्र तपासणी होईपर्यंत इंटरनेटच्या 5G सेवेवर एक अधिस्थगन करण्याची शिफारस मांडली होती. त्यामध्ये 5G रेडिओ फ्रीक्वेंसी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स (RF-EMF)ची  लक्षणीय वाढ दिसून आली आणि ही फ्रीक्वेंसी मानवांसाठी आणि पर्यावरणास हानिकारक असल्याचे सिद्ध झाले होते. २०१८ मध्ये युरोपियन संसदेने सांगितले की, विद्युत व चुंबकीय क्षेत्रातील संभाव्यत: हानिकारक प्रभावापासून जनतेस संरक्षण देण्याची प्राथमिक जबाबदारी वय आणि आरोग्याच्या स्थितीनुसार अवलंबित करण्याच्या उपायांचा समावेश असलेल्या सदस्य कंपनी आणि राज्यावर राहील.

सध्याच्या 4G मध्ये आणि येणाऱ्या 5G मध्ये आपल्याला कमालीचा फरक जाणवेल. यात वैकल्पिक विद्युतप्रवाह (अल्टरनेट करंट) किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचा महत्त्वपूर्ण भाग असेल. सिग्नल्सचा विचार करता,  5G तंत्रज्ञान रेडिओ मिलिमीटर बॅन्ड ३० ते ३०० गीगाहर्ट्झ रेंजमध्ये, तर 4G  ६ गीगाहर्ट्झच्या आसपास आहे. जेव्हा इंटरनेटची अधिक गरज भासते उदा. व्हिडिओ, इंटरनेट वापरकर्त्यांची वाढ, डेटा वाहतुकीमध्ये वाढ यामध्ये विलंबता लागू होते, तेव्हा ते ६० ते १२० पट वेगाने वाढते. 5G बाबतीत सांगायचे झाले तर आपण एखादी गोष्ट पहिली कि ती प्रतिक्रिया मेंदूपर्यंत पोहचायला जितका वेळ लागतो अगदी तेवढ्या वेळेत उपकरनांतून इंटरनेट डेटा वाहिला जाईल. जेव्हा सिग्नल्सची फ्रीक्वेंसी जास्त असते, तेव्हा तिचे तांत्रिक फायदे तर असतातच परंतु पर्यावरणाच्या दृष्टीने ती धोक्याची असते. अशा फ्रीक्वेंसीसाठी अँटेना अगदी जवळजवळ लागतात.

मानव, प्राणी आणि पर्यावरणासाठी 2G, 3G आणि 4G  रेडिओ फ्रिक्वेंसी साधारण होती. 5Gच्या वायरलेस सिस्टीममध्ये नवीनवीन प्रगती होईल. 5G यंत्रणेत मोठे चॅनेल्स, उच्च गती, डेटाचे मोठे पॅकेट, घातांकीय प्रतिसाद आणि एकाच स्थानावरून होस्ट डिव्हाइसेस कनेक्ट करण्याची क्षमताही वाढली जाईल. यामध्ये सुरुवातीला काही अडथळे येतील नंतर जशी सिग्नल्सची तीव्रता वाढत जाईल तसे अडथळे दूर होतील.

सध्या 4G च्या तरंगलांबी आपल्या त्वचेभोवती  वावरतात, तर 5Gच्या तरंगलांबी त्वचेसाठी अधिक घातक असतात. या सिग्नल्समुळे मानवी त्वचेबरोबर मेंदूवरही परिणाम होईल असे सांगितले जाते आहे.   जेव्हा 5Gची  तरंगलांबी उत्सर्जित होते, तेव्हा आपली त्वचा स्वयंचलितपणे त्यांना शोषून घेते आणि तेव्हा नैसर्गिकरित्या त्वचेवर तापमानात वाढते. आपण सर्वांनी रोबोट २.० हा सिनेमा पाहिलाही असेल, अर्थात वरती दिलेले सिग्नल्स  पक्षांसाठी तर खूप घातक आहेत. 5G चे टेस्टिंग करते वेळी नेदरलँडमध्ये ३०० हून अधिक पक्षांनी आपले प्राण गमावले आहेत, ही वस्तुस्तीथी आहे.
 
मागच्या वर्षीच 5Gच्या संदर्भातील पृथ्वीच्या इतिहासातील पहिली ग्लोबल इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन चाचणी झाली आहे. यापैकी बहुतेक शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की हे सिग्नल्स म्युटेजेनिक आहेत, याचा अर्थ ते जीवनाच्या डीएनए संरचनेत बदल करतात. परंतु काही शास्त्रज्ञांचाही  असा विश्वास आहे की जीव  सृष्ठी धोक्यात आहेत आणि यासाठी अजून काही चाचण्यांची आवश्यकता आहे. या तीव्रतेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे कर्करोग होतो. २०२१ पर्यंत प्रत्येक शहरात 5G टॉवर्स आणि सेल स्टेशन असतील. हे डिव्हाइस जगभरातील लाखो इमारतींच्या वर किंवा आपल्या आजूबाजूला असतील. अंतरराष्ट्रीय कायद्याखाली 5G तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणे गुन्हा आहे असेही काही कंपन्यांवर आरोप झाले आहेत.

असे 5G  टॉवर्स आणि मिनी-स्टेशन अत्यंत धोकादायक आहेत. लहान मिलिमीटर सिग्नल्स अधिक धोकादायक नसतात, त्यास लक्षावधी अधिक छोट्या सेल टॉवर्सची आवश्यकता असते, संभाव्यत: २ ते ८ घरामागे एक टॉवर. याचा अर्थ असा आहे की मनुष्याच्या आरोग्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे  धोका वाढणार आहे, ते मानवी शरीराच्याही पेशींवर परिणाम करून डीएनए नष्ट करतात, ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो. अर्थातच हे टॉवर्स केवळ धोकादायक नाहीत; तर ते प्राणघातक आहेत.

शात्राज्ञांच्या मते यामुळे खालील आजार उदभवू शकतात.
  •     मळमळ
  •     सूज
  •     केसांचा तोटा
  •     कमी प्रमाणात भूक
  •     कमी ऊर्जा
  •     खराब झालेले अस्थिमज्जे
  •     दुखणेयुक्त अवयव
  •     खोल निराशा
  •     तणाव
  •     संक्रमण
  •     अशक्तपणा आणि मृत्यू

संभाव्य शक्यता तर खूप आहेत. अनेक धोके टाळण्यासाठी अनेक अमेरिकन, चीनी, कोरियन खाजगी कंपन्या 5G वर खूप संशोधन करत आहेत. 5G तंत्रज्ञानाला वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या पध्दतीने वापरणार आहेत. महत्वाची गोष्ट ही आहे कि कोणती कंपनी पहिल्यांदा 5G तंत्रज्ञान  प्रत्येक्षात उतरवेल. होऊ शकते कि आपल्या पिढीवर 5Gचे वाईट परिणाम होणार नाहीत, परंतु येणाऱ्या पिढीला या परिणामाला तोंड द्यावे लागेल. आजच्या सर्वच प्रमुख तंत्रज्ञानामध्ये 5G एक लक्षणीय तंत्रज्ञान समजले जाते आहे आणि याचे भविष्य काय असेल हे आज सांगणे कठीण आहे.

Saturday, June 8, 2019

अझीम प्रेमजी - लढवय्या आणि दानशूर उद्योजक

- Ganesh Atkale. ( Software Engineer )


“आपल्यापैकी ज्यांच्याकडे, संपत्ती मिळविण्याचा विशेषाधिकार आहे, त्यांनी लाखो लोकांसाठी चांगले जग निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी लक्षणीय योगदान दिले पाहिजे, अशी कायम आशा बाळगतो”
– अझीम प्रेमजी .

महान उद्योजकांचे अद्वितीय लक्षण म्हणजे त्यांची मेहनत, जिद्द, चिकाटी, दूरदृष्टी. असे अनेक गुण त्यांनी ध्येय मिळवण्यासाठीच्या प्रयत्नात उतरलेले असतात हे आज आपण उद्योजकांमध्ये जवळून पाहतो आहोत. जगात भारताचे प्रतिनिधित्व करणारे असे मोठे उद्योजक अगदी बोटांवर मोजण्याइतकेच आहेत. या यादीतील विप्रो उद्योग समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष अझीम प्रेमजी यांचं नाव आपल्याला अभिमानाने घेता येईल. नुकतेच त्यांनी ३० जुलै रोजी निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. एखादा उद्योगपती निवृत्त होणे हा काही खूप मोठा चर्चेचा विषय होऊ शकत नाही; परंतु अझीम प्रेमजींची निवृत्ती याला अपवाद आहे. कारण ते उद्योगपतींच्या साचेबद्ध प्रतिमेत बसणारे नाहीत, अझीम प्रेमजी एक दानशूर उद्योगपती आहेत. गेली ५३ वर्षे विप्रो कंपनीची धुरा त्यांनी सांभाळली आहे.

कारभारातील पारदर्शकता, उच्च गुणवत्ता, मेहनत अशी ‘विप्रो’ उद्योगसमूहाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील आणि दानशूरतेच्या बाबतीत तर प्रेमजी यांनी एक मानदंड प्रस्थापित केलेला आहे. ‘फोर्ब्स’ने जाहीर केलेल्या यादीनुसार अझीम प्रेमजी यांच्याकडे १,१२० कोटी डॉलरची संपत्ती आहे. ते जगातील ९१वे अब्जाधीश (बिल्येनयर) आहेत. त्यांनी २ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी संपत्ती शिक्षण कार्यासाठी तर त्यांच्या मालकीचे २१३ दशलक्ष किमतीचे शेअर्स समाज कार्यासाठी दान करण्याचे ठरविले. ही रक्कम शेकडो कोटी रुपयांच्या घरात जाते. तिचा विनियोग अझीम प्रेमजी ट्रस्टच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यासाठी आणि खास करून शैक्षणिक कार्यासाठी निरपेक्ष वृत्तीतून केला जात आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा प्रकारचे कार्य करणाऱ्यांतील वॉरन बफेट, बिल गेट्स यांच्या ‘गिव्हिंग प्लेज’ नामक मोहिमेत सहभागी होणारे प्रेमजी हे पहिलेच भारतीय उद्योजक आहेत. २००१ पासून त्यांची ‘अझीम प्रेमजी फाउंडेशन’ ही संस्था त्यासाठीच कार्यरत आहे. मार्च २०१९मध्ये त्यांच्या शेअर्समधला ३४% हिस्सा समाजकार्यासाठी दान करणार असल्याचे घोषित केले, जो २०१५ मध्ये १८% होता. शिक्षण हा त्यांचा स्वतःचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे प्रेमजी यांना स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्युत अभियांत्रिकी विषयाचे उच्च शिक्षण अर्धवट सोडून भारतात परत यावे लागले होते. कोणालाही आर्थिक कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहायला मिळू नये, असा त्यांचा ध्यास आहे. म्हणूनच ते अनेक शिक्षण संस्थांच्या मदतीला धावून जातात.

तांदूळ ते सॉफ्टवेअर : -

२४ जुलै १९४५ रोजी अझीम प्रेमजी यांचा जन्म गुजरातच्या एका मुस्लिम परिवारात झाला. प्रेमजी यांचे आजोबा ब्रिटिशांच्या काळात अनेक देशांत तांदूळ निर्यातीचा व्यवसाय करीत होते. त्यांची अनेक देशांत तांदूळाचा व्यापार करण्यासाठी कार्यालये होती. त्यांना ‘राईस किंग’ म्हणूनही ओळखले जात होते. भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी आपल्या देशप्रेमामुळे अझीम यांचे वडील मोहम्मद हशेम प्रेमजी हे पाकिस्तानमध्ये स्थलांतरीत न होता भारतातच राहिले. बॅरिस्टर जिना यांची या प्रेमजी खानदानाशी जवळची ओळख होती. जिना यांनी मोहम्मद हशेम प्रेमजी यांच्याशी पाकिस्तानात येण्यास विचारपूस करूनही ते जिनांच्या दबावाला बळी पडले नाहीत. भारतात त्यांचा ‘वेस्टर्न इंडिया प्रॉडक्ट्स’ या नावाने वनस्पती तेल, तूप व साबण निर्मितीचा व्यवसाय होता. या कंपनीच्या आद्याक्षरापासून ‘विप्रो’ हा शब्द तयार झाला .
प्रेमजी अझीम यांचे वडील मोहम्मद हशेम प्रेमजी यांचे अचानक निधन झाल्याने वयाच्या २१ व्या वर्षी त्यांच्यावर कंपनीची जबाबदारी आली. त्या वेळी विप्रो ही कंपनी खूप लहान होती. तेव्हा अझीम अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवीचे शिक्षण घेत होते. १९६६मध्ये कंपनीची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आली.

वेगवेगळ्या क्षेत्रात कंपनीचा मोठा विस्तार होत गेला. आपल्यासारखे अनेक उद्योग पुढे येत होते, अनेक तंत्रज्ञान येत होते हे पाहून अझीम यांनी आपल्या व्यवसायासाठी उपयुक्त गोष्टी घेतल्या. नव्या तंत्रज्ञानाची पारख करून तांदूळ, साबण, तेल, तूप या पारंपरिक धंद्यांच्या विस्तारीकरणासह त्यांनी अन्य क्षेत्रांतही पदार्पण केले. विप्रो टेक्नॉलॉजिस, विप्रो प्लुइडपॉवर, लायटिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, इकोएनर्जी, मॉड्युलर फर्निचर अशा अनेक कंपन्या काढल्या. यासाठीची लागणारी आणि व्यवसाय वाढवण्यासाठी टिकणारी माणसे निवडणे प्रेमजींसाठी आव्हानात्मक काम होते.

जागतिकीकरणाच्या लाटेत झोकून देणारा साहसवीर : -

८० च्या दशकात भारतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने नवीन उद्योजकांना व्यवसायासाठी आणखी एक मार्ग दाखवला, तो म्हणजे सॉफ्टवेअर निर्मितीचा. हे वेळीच हेरून त्या क्षेत्रात विप्रो इन्फोटेकने, कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रावर जागतिक पातळीवर आपली छाप उमटवण्यास सुरुवात केली.

-१९८८मध्ये विप्रोने हेव्ही ड्युटी इंडस्ट्रियल सिलेंडर आणि मोबाइल हायड्रॉलिक सिलेंडर याचाही आपल्या उत्पादन लाइनमध्ये सहभाग केला. वैद्यकीय क्षेत्रात उपकरणे तयार करणारी ‘जनरल इलेक्ट्रिकल’ या अमेरिकन कंपनीशी करार करून १९८९मध्ये विप्रो वैद्यकीय क्षेत्रातही उतरली.

-१९९२मध्ये ‘विप्रो फ्लुइड पॉवर डिव्हिजन’ने बांधकाम उपकरणे आणि ट्रक टिपिंग सिस्टिमसाठी मानक हायड्रोलिक सिलेंडर ऑफर करण्याची क्षमता विकसित केली.

-१९९०मध्ये ‘संतूर’ टॅल्कम पावडर आणि बेबी टॉयलेटरीजची ‘विप्रो बेबी सॉफ्ट’ अशी उत्पादने सुरू करण्यात आली, जी आजही लोकप्रिय आहेत. बरोबरच विप्रो सॉफ्टवेअरला जगभरातून ग्राहक मिळत होते. विप्रो सॉफ्टवेअरसुद्धा झपाट्याने वाढत होती. विप्रोसारख्या भारतीय आयटी कंपन्यांमुळे भारतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात एक प्रकारची क्रांती आली होती.

-१९९५ मध्ये विप्रोच्या उत्पादन निर्मिती आणि वाढता विकास पाहून विप्रोला ‘आयएसओ ९००१’ नामांकन मिळाले. १९९९ मध्ये विप्रोने सुपरजीनिअस पर्सनल कॉम्प्यूटर्स निर्माण करून जागतिक स्तरावर आपला वेगळा ठसा निर्माण केला.

-२०००मध्ये विप्रोला न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध करण्यात आले. फेब्रुवारी २००२मध्ये सॉफ्टवेअर सेवा आणि तंत्रज्ञानामधील विप्रो ही ‘आयएसओ १४००१’ प्रमाणित होणारी भारतातील पहिली कंपनी बनली. विप्रो प्रचंड वाढत होती, एका अभ्यासात दिसून आले की, १९९५ ते २००० या ५ वर्षात वेगवान संपत्ती निर्माण करणारी विप्रो एकमेव कंपनी होती. २००४मध्ये विप्रोची उलाढाल १ अब्ज डॉलर्सच्या घरामध्ये झाली. त्यातच ‘आई-शिक्षा’ या गरिबांना मदत करणाऱ्या योजनेसाठी विप्रोने इंटेलबरोबर भागीदारी केली. विप्रोने अनेक अमेरिकन आणि युरोपियन लहान कंपन्या विकत घेतल्या. बरोबरच जर्मनीतील नोकिया सीमेन्स नेटवर्क्ससह संशोधन भागीदारी करार केला. २००८ मध्ये, विप्रोने इको एनर्जीसह स्वच्छ ऊर्जा व्यवसायातही प्रवेश केला. विप्रो सध्या १.३ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतक्या किमतीची कंपनी आहे. विप्रोमध्ये १ लाख ७० हजार कर्मचारी काम करतात. जगभरात ५४ देशात विप्रोची कार्यालये आहेत. मुख्य कार्यालय बंगळूरू येथे आहे.

साधी राहणीमान व निगर्वी : -

 अझीमजी यांचं राहणीमान अगदी साध्या पद्धतीचं आहे. त्यांना स्वतःच्या संपत्तीचा कसलाही गर्व नाही. एकदा ऑफिसला आल्यानंतर एका कर्मचाऱ्याने अझीमजींच्या गाडीच्या जागेवर स्वतःची गाडी पार्क केली म्हणून त्या कर्मचाऱ्याला पहारेकऱ्यांनी विरोध केला. अझीमजी ऑफिसला आल्यानंतर म्हणाले “गाडीसाठी ज्याला जी जागा मिळेल त्या जागी प्रत्येक कर्मचारी आपली गाडी पार्क करू शकतो. मला त्याच ठिकाणी गाडी पार्क करायची असेल, तर मला ऑफिसला इतरांपेक्षा लवकर यायला पाहिजे.”

विदेशात गेल्यानंतर अझीमजी कोणत्याही हॉटेलमध्ये न राहता कंपनीच्या गेस्ट हाउसमध्ये राहतात. एअरपोर्टला टॅक्सी किंवा रिक्षाने जातात.

१९८७मध्ये कर्नाटकमधील विप्रोच्या तुमकूर कारखान्यामध्ये विजेचे कनेक्शन घेण्यासाठी अझीमजींना एका सरकारी कर्मचाऱ्याने एक लाख रुपयांची लाच मागितली होती. अझीमजी यांनी लाच देण्यास नकार दिला. ते म्हणाले, “नियमाने वीज मिळत नसेल, तर आम्ही स्वतःची वीज तयार करू.” मग विप्रोने जनरेटरने काम चालवले. याच्यासाठी किमान १.५ करोड रुपयांचा खर्च झाला.

१९७७मध्ये एकदा विप्रोच्या बेंगळुरुतील ऑफिसमध्ये रामनारायण अग्रवाल नावाची व्यक्ती इंटरव्ह्यूसाठी आली. ऑफिसमध्ये कोणीच नसल्याने तो व्यवस्थापनामधील लोकांची वाट पाहत होता. तितक्यात एक व्यक्ती येवून ऑफिसचे दरवाजे-खिडक्या उघडू लागला, जारमध्ये पाणी भरू लागला. रामनारायण अग्रवालला वाटले की, हा कोणी स्वच्छता करणाऱ्यांपैकी असेल. अग्रवालचा इंटरव्ह्यू सुरु झाल्यानंतर त्या व्यक्तीने सांगितले, ‘मी अजीम प्रेमजी आहे.’

अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित : -

अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या माध्यमातून अझीम प्रेमजी यांनी कर्नाटकात अझीम प्रेमजी विद्यापीठ स्थापन करण्याचे ठरवले आहे. भारत सरकारने त्यांचे औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक कार्य, दानशूरता असे सर्व प्रकारचे काम लक्षात घेऊन २००५ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि २०११मध्ये ‘पद्मविभूषण’ या उच्च नागरी पुरस्काराने गौरविले आहे. अशाच त्यांच्या योगदानामुळे २००९मध्ये त्यांना अमेरिकेतील वेस्लेयन विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी प्रदान केली. २००० साली ‘एशिया विक’ने त्यांची जगातील २० सर्वाधिक सामर्थ्यवान पुरुषांच्या यादीत निवड केली. ‘टाइम’ने २००४ मध्ये त्यांना जगातील एक प्रभावशाली उद्योजक म्हणून गौरविले होते.

आंतराराष्ट्रीय स्तरावर औद्योगिक क्षेत्रात भारताची वेगळी ओळख निर्माण करण्यास अझीम प्रेमजी यांचा मोलाचा वाटा आहे. नवीन युवकांसाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांनी अनेक रोजगार उपलब्ध केले. भारत सरकार ‘डिजिटल इंडिया’ साकारत असताना अझीम प्रेमजी विप्रोच्या आणि समाजकार्याच्या माध्यमातून यासाठी अमूलाग्र मदत करत आहेत. अझीम प्रेमजी अनेक लहान-मोठ्या उद्योजकांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत.

अझीमजी आजही आवर्जून सांगतात, की “‘तुमच्या मनात व्यवसायाबद्दलच्या ज्या कल्पना आहेत त्या प्रत्यक्षात उतरवा, कारण दहा चुकीच्या कल्पनांनंतर एक सुंदर कल्पना अशी असेल की त्यामागे तुमचे यश दडलेलं असेल आणि त्यापासून मिळालेलं समाधान विलक्षण असेल. प्रयत्न न करणे हा स्वतःचा सर्वात मोठा पराभव असतो.”

Published in 'The Wire' on 09 June 2019.

Friday, May 31, 2019

नवे तंत्रज्ञान नव्या नोकऱ्या - भाग २

क्लौड कॉम्प्यूटिंग 

पूर्वी पाहिल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा कल, क्लाउड कंप्युटिंग मुख्य प्रवाहाचा विषय बनला आहे. उदा. प्रमुख मुद्दे 
एडब्ल्यूएस अमेझॅन वेब सर्व्हिसेस, मायक्रोसॉफ्ट ऍझूर आणि गुगल क्लाउड हे  आजच्या टेक्नोलॉजीच्या मार्केटमध्ये  वर्चस्व गाजवत आहेत. क्लाउड कंप्यूटिंगचा अवलंब अद्याप वाढत आहे कारण अधिकाधिक व्यवसाय क्लाउड सोल्यूशनमध्ये स्थलांतरीत होत आहेत. एज ऑफ कम्प्युटिंग ची संख्या इंटरनेट (आईओटी) डिव्हाइसेस वाढवण्यासाठी वापरली जाईल. २०२२ पर्यंत, जागतिक एज कम्प्युटिंग मार्केटमध्ये ६.६७  अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. कोणत्याही वाढत्या बाजाराप्रमाणे ही नोकरीची मागणी निर्माण करेल, मुख्यतः सॉफ्टवेअर अभियंतेसाठी.

RPA

आरपीएमध्ये करियर सुरू करण्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट असल्यास, रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन (आरपीए) कोर्स सुरू करण्याची  गरज आहे. डेटा एंट्री, डेटा मॅनिप्युलेशन, अनुप्रयोगांची व्याख्या करणे, व्यवहार प्रक्रिया करणे, डेटाशी व्यवहार करणे आणि ईमेलवर प्रत्युत्तर देणे यासारख्या व्यवसाय प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी RPA सॉफ्टवेअरचा वापर होतो. अर्थात हे ऍटोमेशन आहे आणि अशा सॉफ्टवेअरला रोबोट सॉफ्टवेअर म्हणतात.  हेही तंत्रज्ञान जागतिक बाजारपेठेत अनेक नोकरदारांच्या मागण्या वाढवत आहे. 

मशीन लर्निंग आणि आर्टिफिशल इंटीलिजन्स

या तंत्रज्ञानात मनुष्यासारखे मशीन स्वतः शिकते. अर्थात हेही रोबोटिक्स थेअरी आहे. मशीन लर्निंग हा AI चाच एक भाग आहे ज्यांत गणिती प्रक्रियेने संगणकाला शिकवले जाते. मशीन लर्निंग हे आज काल संगणक क्षेत्रांतील सर्वांत प्रभावी तंत्रज्ञान आहे आणि इथेही खूप पगाराच्या नोकऱ्या निर्माण होत आहेत.



नवे तंत्रज्ञान नव्या नोकऱ्या - भाग १

ब्लॉकचेन
हे एक डिजिटल चलन निर्मितीसाठी लागणारे नवीन तंत्रज्ञान आहे. बहुतांशी  लोक बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीसंबंधातले ब्लॉकचेन या तंत्रज्ञानामध्ये उतरण्याचा विचार करत असतील, तर ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान एक प्रकारची सुरक्षा प्रदान करते जे बऱ्याच मार्गांनी उपयुक्त आहे. सर्वात सोप्या शब्दात म्हणजे, ब्लॉकचैनचा डेटा आपण केवळ चैनमध्ये जोडू शकता, त्यातून काढून टाकू किंवा बदलू शकत नाही. म्हणूनच "साखळी" शब्द आपण डेटाची चैन तयार करणे या अर्थाने घेतला आहे. मागील अवरोध बदलण्यास सक्षम नसल्याने हे सुरक्षित आहे. ब्लॉकचेनसह, व्यवहाराचे पर्यवेक्षण करण्यासाठी किंवा प्रमाणित करण्यासाठी आपल्याला कोणत्याही थर्ड पार्टीची आवश्यकता नसते. 

टेकक्रंच या कंपनीच्या मते, ब्लॉकचेन ही  दुसरी सर्वात वेगवान वाढणारी टेक्नोलॉजी आहे, प्रत्येक ब्लॉकचेन  डेव्हलपरसाठी १४ जॉब ओपनिंग्स आहेत. जे ब्लॉकचेन डेव्हलपर ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करुन आर्किटेक्चर आणि सोल्यूशन्सचे विकास आणि अंमलबजावणी करण्यासाठी कौशल्यधारक होतात त्यांना पुढे खूप मागणी राहते.

तथापि विकासकांची नोकरी केवळ ब्लॉकचैन स्पेसमध्ये उपलब्ध नाही. अनेक कंपन्या कौशल्यपूर्ण  सॉफ्टवेअर अभियंता, सल्लागार आणि प्रकल्प व्यवस्थापक देखील शोधत आहेत. ब्लॉकचेन संबधित अनेक नोकऱ्या आर्थिक संस्थांमध्येही उपलब्ध आहेत, परंतु या किरकोळ आणि हेल्थकेअरमध्ये आणि लवकरच कदाचित मॅन्युफॅक्चरिंग देखील उपलब्ध होतील.

सायबर सेक्युरिटी  
सायबर सुरक्षा कदाचित इतर उदयोन्मुख तंत्राप्रमाणे दिसत नाही, परंतु ते इतर तंत्रज्ञानासारखेच विकसित होत आहे. हे या संकल्पनेचे वैशिष्ट आहे.  बेकायदेशीरपणे डेटा ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करणारे गुन्हेगार हॅकर्स आपला बेकायदेशीर प्रयत्न  सहजासहजी सोडू शकत नाहीत आणि त्यांना कठोर सुरक्षा उपायांचा मागोवा घेण्याचे मार्ग एथिकल हॅकर्स करत असतात. हल्ली सुरक्षा वाढविण्यासाठी हे नवीन तंत्रज्ञान आचरणात येत आहे. त्यापैकी तीन प्रगती हार्डवेअर ओथंटीकेशन , क्लाउड टेक्नॉलॉजी आणि डीप लर्निंग हेही आहे. दुसरी यादी डेटा हानी प्रतिबंध आणि वर्तणूक विश्लेषणे जोडते. जोपर्यंत आपल्याकडे हॅकर्स आहेत तोपर्यंत आमच्याकडे उदयोन्मुख तंत्रज्ञान म्हणून सायबर सुरक्षा असेल, कारण ते सतत त्या हॅकरच्या विरोधात बचाव करण्यासाठी विकसित होत असतात.

सायबर सुरक्षा करणाऱ्या व्यावसायिकांच्या सशक्त आवश्यकता असल्याचा पुरावा म्हणून, सायबर सुरक्षा कार्यांची संख्या इतर तंत्रज्ञान नोकर्यांपेक्षा तीन पट वेगाने वाढत आहे. तथापि, त्या नोकऱ्या भरल्याबद्दल आपण कमी पडत आहोत. याचा परिणाम असा आहे की २०२१पर्यंत आमच्याकडे ३.५  दशलक्ष असुरक्षित सायबर सुरक्षितता नोकऱ्या असतील. जे  या डोमेनमध्ये सामील होऊ इच्छित आहेत  आणि त्याच्याशी टिकून राहण्याची इच्छा बाळगणारे असतील त्यांच्यासाठी  एक उत्तम करियर मार्ग आहे. 

इंटरनेट ऑफ दी थिंग्ज (IoT)
आयओटी (IoT) हे तंत्रज्ञान इंटरनेटवर डेटा कनेक्ट करण्यासाठी आणि देवाणघेवाण करण्यासाठी डिव्हाइसेस, होम अॅप्लिकेशन्स, कार आणि बरेच काही उपकरणे इंटरनेटच्या कनेक्शनमधून सक्षम करते आणि आपण सध्या आयओटीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहोत. २०१७  मध्ये आयओटी डिव्हाइसेसची संख्या ८.४ अब्जपर्यंत पोहोचली आणि २०२०  पर्यंत ३०  अब्ज डिव्हाइसेसपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

सध्या ग्राहक म्हणून, आपण आधीच आयओटी वापरत आहोत आणि फायदा घेत आहोत. आपण कामासाठी निघताना विसरून  आणि कामावरुन घरी जाताना आपल्या ओव्हनस आधीपासूनच विसरल्यास आपण तो आयओटीमुळे बंद करू शकतो किंवा आपण आमच्या दरवाजे दूरस्थपणे लॉक करू शकतो, परंतु व्यवसाय करण्यासाठी भविष्यात देखील बरेच काही चित्र असणार आहे. आयओटी डेटा गोळा आणि विश्लेषित केल्याने व्यवसायासाठी अधिक सुरक्षितता, कार्यक्षमता आणि निर्णय घेण्यास सक्षम बनू शकते. यासंबंधीचे सध्या  अपुरे कौशल्य मानले जाते जेणेकरून हा उद्योगातील विकासातील सर्वात मोठा अडथळा आहे.

आयओटीमधील करिअरमध्ये रूची असलेल्या एखाद्याला, जर आपण प्रेरणा दिली असेल तर प्रारंभ करण्याच्या अनेक पर्यायांसह या क्षेत्रामध्ये सहज प्रवेश करा. आवश्यक कौशल्यांमध्ये आयओटी सुरक्षा, क्लाउड कॉम्प्युटिंग ज्ञान, डेटा अॅनालिटिक्स, ऑटोमेशन, एम्बेडेड सिस्टम्सची समज, डिव्हाइस ज्ञान, अशा  काही गोष्टींचा समावेश आहे. अखेरीस, हे सर्व काही इंटरनेट आहे आणि त्यात  गोष्टी अनेक आणि विविध आहेत, म्हणजे त्यातून आवश्यक ते शिकतादेखील येते.

जरी तंत्रज्ञान आपल्या सभोवताली उभारत आणि विकसित होत असले तरी हे अनेक डोमेन आता करिअरच्या संभाव्य क्षमतेची आणि भविष्यासाठी उपयुक्त आहेत. आणि आजचे नवीन येणारे तंत्रज्ञान कुशल कामगारांच्या कमतरतेमुळे त्रस्त आहे, याचा अर्थ एक विषय  निवडणे, प्रशिक्षित होणे आणि तंत्रज्ञानाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर जाणे आपल्यासाठी योग्य आहे आणि यश मिळविण्यासाठी आणि भविष्यात नवनवीन तंत्रज्ञानात यश मिळविण्याची ही एक चांगली संधी आहे.

Saturday, May 18, 2019

राजीव गांधी - भारतीय माहिती तंत्रज्ञान क्रांतीचे जनक

स्व. राजीव गांधी यांनी बऱ्याच औद्योगिक क्षेत्रांना प्राधान्य देत आय. टी. इंडस्ट्री भारतात आणली, अर्थात ही एक प्रकारची क्रांतीच होती. यामुळेच राजीव गांधी यांना 'भारतीय दूरसंचार क्रांतीचा आणि माहिती तंत्रज्ञानाचा जनक ' म्हणून सन्मानित केले जाते. त्यांना डिजिटल इंडियाचे आर्किटेक्ट म्हणूनही ओळखले जाते. राजीव गांधींनी विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि संबंधित उद्योगांना प्रोत्साहन दिले आणि अशा उद्योगांवर विशेषतः संगणक, एअरलाइन्स, संरक्षण आणि टेलिकम्युनिकेशन्सवरील आणि आयात कोट्यावरील, कर आणि शुल्क कमी करण्याचा हा एक मार्ग होता. पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी १९८६मध्ये देशातील उच्च शिक्षण कार्यक्रमांचे आधुनिकीकरण आणि विस्तार करण्यासाठी राष्ट्रीय धोरणे (एनपीई) जाहीर केली, ज्यामुळे ग्रामीण भागातील उत्तम गुणवत्तेचा फायदा होईल आणि याचा बऱ्याच तंत्रज्ञानाचा भारताला फायदा झाला आणि त्यातून इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञानाच्या शिक्षणसंस्थांचा खऱ्या अर्थाने उदय झाला.

राजीव गांधीच्या युगाच्या अगोदर भारतीय सरकार किंवा  भारतीय उद्योग माहिती तंत्रज्ञानाच्या संकल्पनेशी परिचित नव्हता. राजीव गांधींनी जाणले होते की भारत कनेक्टिव्हिटीच्या काळाच्या युगात आहे म्हणूनच सी-डीओटी Centre for Development of Telematics (C-DOT) ने  देशभरातील दूरसंचार नेटवर्कची स्थापना केली. सॅम पितरोडा (राजीव गांधींचे सल्लागार) कॉइन-ड्रॉपिंग पब्लिक कॉल ऑफिस (पीसीओ) ची संकल्पना देखील सादर केली, ज्यामुळे दूरसंचार उद्योगाच्या वाढीस मदत झाली. १९८७ मध्ये, पंतप्रधान राजीव गांधी यांचे मुख्य तंत्रज्ञान सल्लागार म्हणून पितरोडा यांच्या काळात त्यांनी भारताच्या दूरसंचार आयोगाची स्थापना केली. सरकारने संगणकांवर नियंत्रण काढले आणि प्रोसेसरसह पूर्णपणे एकत्रित मदरबोर्ड आयात करण्याची परवानगी दिली ज्यामुळे संगणकांच्या किंमती कमी झाल्या. त्यानंतर, १९९५मध्ये तत्कालीन सार्वजनिक क्षेत्रातील विदेश संचार निगम लिमिटेडने सार्वजनिक प्रवेशासाठी एकाधिकाराने भारताची प्रथम इंटरनेट सेवा सुरू केली.

तंत्रज्ञान आधुनिकीकरण करण्यासाठीच्या लिलावाच्या धोरणाचा भाग म्हणून १९९१ मध्ये दूरसंचार सुधारणांसाठी पुढाकार घेतला. १९९७ मध्ये सरकारी हस्तक्षेप कमी करण्यासाठी भारतातील दूरसंचार नियामक प्राधिकरण (टीआरएआय) ची स्वतंत्र नियामक संस्था  स्थापना केली गेली. काही अमेरिकन आणि युरोपियन कंपन्यांशी  दूरसंचार करासाठी भागीदारी झाली. भारतीय कंपन्या स्थापन होऊन टेलिकॉमसह सॉफ्टवेअर निर्मितीत उतरल्या.

लिबरलायझेशनने १९९८ मध्ये २.३३% ते २०१४मध्ये ७४.५% इतकी वाढ केली आहे. Telecom Regulatory Authority of India (TRAI) ट्रायच्या मते, मोबाईल ग्राहक १९९८मध्ये ०.८८ दशलक्षवरून वाढून ९३३ दशलक्ष झाला आहे. केपीएमजी इंडियाचे भागीदार जयदीप घोष म्हणाले की, सुधारणेमुळे लोकांचे जीवन बदलले आहे. "मोबाइल प्रवेशाच्या दर १०% वाढीमुळे जीडीपीमध्ये १.२% वाढ झाली आहे. आणि ब्रॉडबँड प्रवेशामध्ये दर 10% वाढीसाठी, जीडीपी १-१.२ टक्क्यांनी वाढतो." 

भारताला अजून बरेच काही करण्याची गरज आहे. अर्थात राजीव गांधींनी जी क्रांती आणली ती आज मोठे रूप धारण करत आहे आणि मुख्यत्वे हाच पाया मानून भारत एक टेलिकॉम आणि सॉफ्टवेअर निर्मितीतील सुपर पावर म्हणून ओळख निर्माण करत आहे.

Wednesday, May 15, 2019

ईव्हीएम हॅक होऊ शकते का ?


जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि प्रचंड प्रमाणात राजकीय पक्ष अशा पसाऱ्यामुळे देशात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका ही एक गुंतागुंताची प्रकिया बनलेली आहे. काही वर्षांपूर्वी कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रं ताब्यात घेणं आणि मतपेट्यांमध्ये फेरफार करणं अशा दहशतीच्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळत होत्या. परंतु, आज जसे विज्ञान-तंत्रज्ञान पुढं जात आहे आणि त्याचा वापरही वाढत आहे,  तशी गुन्हे करण्याची पद्धतही बदलत जात आहे.  हल्ली पराभूत होणारा प्रत्येक पक्ष ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार झाल्याने आपला पराभव झाला आणि लोकशाही धोक्यात आहे, असा दावा करतो आहे. लोकशाहीप्रधान भारतासाठी ही गंभीर बाब आहे. ईव्हीएम मशीन हॅक होते या चर्चेने राजकीय वातावरण ढवळून निघत आहे.

मतपेट्यांमधील फेरफार थांबवण्याकरता केरळमधील उत्तर परूर विधानसभा मतदारसंघातून १९८२मध्ये प्रथम ईव्हीएम वापरण्यात आले होते. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगळूरू  आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, हैद्राबाद  या कंपन्याकडून ईव्हीएमची निर्मिती होते. कालांतराने २००३ मध्ये सर्व उप-निवडणुका आणि राज्यसभा निवडणुका ईव्हीएम वापरुन घेण्यात आल्या होत्या, निवडणूक आयोगाने २००४मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी सर्वत्र केवळ ईव्हीएम वापरण्याचा निर्णय घेतला. ही मशीन मुख्यत्वे तीन भागात विभागलेली आहे, बॅलेटींग युनिट ज्यामध्ये आपल्या उमेदवारच्या नावाची आणि चिन्हांची यादी दिसते. दुसरे म्हणजे, कंट्रोल युनिट जे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याच्या हातात असते एका मतदाराने मत दिल्यानंतर ज्याला रीसेट अर्थात पूर्वस्थित करावे लागते. या कंट्रोल युनिटमध्ये आपल्या मताची साठवण होते. तिसरे म्हणजे,  व्हीव्हीपॅट (वोटर व्हेरीफाय्ड पेपर ऑडीट ट्रेल) ज्यामध्ये मतदाराने मत दिल्यानंतर त्याला त्याची पावती दिसते.

ही दिसायला जरी साधारण प्रक्रिया वाटत असली, तरी तितकीशी ही साधारण प्रक्रिया नाहीय. जगभरात काही देश ईव्हीएमचा वापर करतात, तर काही देश करतही नाहीत, अर्थात हे ज्या-त्या देशाच्या कायद्यांवर अवलंबून आहे. २०१७ साली दिल्लीमधील आम आदमी पक्षाचे उमेदवार सौरभ भारद्वाज यांनी विधानसभेत ईव्हीएम हॅक करण्याचे प्रात्येक्षिक दाखविले होते, परंतु प्रात्येक्षिकात वापरले गेलेले मशीन बनावट असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. काही दिवसापूर्वी लंडन येथे झालेल्या सायबर कॉन्फरंसमध्येही सैय्यद सुजा या एका भारतीय हॅकरने २०१४च्या लोकसभेच्या निवडणुकीत ईव्हीएम हॅक झाल्याचा दावा केला होता. निवडणूक आयोगाने तो आरोपही बिनबुडाचा असल्याचे स्पष्ट केले.   कोणतीही मशीन खराब असू शकते म्हणजे मशीनचं बटन चालत नाही, इलेक्ट्रिक पावर मिळत नाही, कव्हर निघाले आहे, अर्थात या अर्थाने! मशीन ज्या सॉफ्टवेअरवर काम करते तो कोड मशीनमध्ये स्थापित केल्यानंतर तो सहजासहजी सामान्य माणसाला वाचता येत नाही. अर्थात ते सर्व एम्बेडेड अर्थात इलेक्ट्रोनिक प्रोग्रामिंग असते.
 
मशीन  हॅक करण्यासाठी त्यात एकदाचा रुपांतरीत केलेला कोड मूळ स्वरुपात आणणे आणि त्यात फेरफार करून मशीन पुन्हा वापरण्याच्या स्थितीत आणणे त्यातील तज्ञ व्यक्तीलाही शक्य होत नाही आणि मशीनमध्ये फेरफार करण्यासाठी किंवा त्याची मेमरी अपडेट करण्यासाठी मशीनला कसलेही पोर्ट किंवा सॉकेट दिलेले नाही, अर्थात त्याचा मदरबोर्डही बदलणे शक्य नाही. जर त्याच्या सॉफ्टवेअर निर्मातीपासूनची तयारीच फेरफार करण्याच्या हेतूने करता आली असली, तरीही मशीनला अनेक चाचण्या अर्थात टेस्टिंग करूनच स्वीकारले जाते, म्हणजे हॅकिंग याही मार्गाने शक्य होत नाही. समजा, हॅकरने मतदान मोजण्याच्या वेळी मशिनच्या डीसप्लेसारखाच  दुसरा डिसप्ले मशीनवर बसवला आणि तो जर एखाद्या ब्लूटूथ उपकरणाने  किंवा अन्य दुसऱ्या रेमोट कंट्रोलने नियंत्रित करता येत असेल तर त्याला पाहिजे तेवढा मतदानाचा आकडा दाखवणे शक्य आहे. ईव्हीएमचे सॉफ्टवेअर बनवणाऱ्या प्रोग्रामरपेक्षा जर कोणी अधिक बुद्धिमान प्रोग्रामर, हॅकर असेल तो काहीही हॅक करू शकतो हेही नाकारता येत नाही. अर्थात ईव्हीएमचे सॉफ्टवेअर अपडेट करण्याची परवानगी, ईव्हीएमची भौतिक सुरक्षितता, निवडणूक आयोगातील प्रामाणिक अधिकारी यासारख्या घटकांवर अवलंबून आहे, अर्थात अधिकारी अथवा सॉफ्टवेअर बनवणारे आणि टेस्ट करणारे तंत्रज्ञ किंवा व्यवस्थापन अप्रामाणिक असेल हॅक झालेलं ईव्हीएम, पुन्हा हॅक  करायची गरजच पडत नाही. 

Published in Dainik Surajya, Solapur 30 May 2019.

Wednesday, May 1, 2019

फेसबूकच्या प्रवासाची गोष्ट

आज आपण जे फेसबुक वापरत आहोत, या फेसबुकची सुरुवात  योगायोगानेच झाली असे म्हणता येईल. जानेवारी २०१८ च्या आकडेवारीनुसार आपल्यासारखेच जगभरातून फेसबूकचे आणखी दोन अब्ज युझर्स आहेत. २००८ मध्ये फेसबुक युझर्स वाढण्याचा रेट तब्बल २०० पटींनी वाढला आणि अजूनही तो वाढत आहे. फेसबुक ही जगाततील सर्वात मोठी सोशल नेट्वर्किंग साईट म्हंटलं की लगेच आपल्या डोक्यात मार्क झुकरबर्गचं नाव येतं. मार्क झुकरबर्गची यशोगाथा सांगणारे 'द फेसबूक इफेक्ट' नावाचे पुस्तक डेव्हिड कर्कपॅट्रिक याने लिहिले आहे. त्याचा आणि  फेसबूकचा प्रवास दर्शवणारा 'दी सोशल नेटवर्क' नावाचा सिनेमाही येवून गेला. १९ वर्षाच्या मार्कने २००१ साली हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. शाळेत असताना मार्कला भौतिकशास्त्रात, खगोलशास्त्रात, भाषा अशा अनेक विषयात खूप सारी बक्षिस मिळाली होती. जास्त बोलणं मार्कला आवडत नसे. मार्कचं राहणीमान अगदी साधं होतं. तो १९ वर्षाचा असतानादेखील जणू १०-१२ वर्षाचा शाळेतला विद्यार्थी वाटत असे. तो नेहमी शांतच असायचा, परंतू शांत मार्क एकदा का तो बोलला की ऐकणाऱ्यांना विचार करायला लावायचा. काही जणांच्या मते, मुलींना मार्कची विनोदबुद्धी, त्याचा आत्मविश्वास, त्याचं खोडकर स्मितहास्य याबद्दल आकर्षण वाटत असे. हार्वर्डच्या 'कर्कलँड हाऊस' या वसतिगृहात मार्कनं आपलं  बस्तान मांडलं होतं. त्याला काहीही फळ्यावर लिहून बघणे आवडत असे. उदाहरणार्थ प्रोग्रामिंगचे लॉजिक, गणितं, कोडी. यासाठी त्यानं आपल्याबरोबर एक फळाही ठेवला होता.  त्याला लिखाणातही चांगला रस होता. तो फळ्यावर किंवा आपल्या लिखाणात व्यस्त नसला की तो आपल्या कॉम्पुटरवर प्रोग्रामिंगमध्ये व्यस्त असत.

मार्कचे तीन रूममेट्स मनमोकळे होते. त्याला आवाराआवरीचा जाम कंटाळा यायचा, त्यामुळं त्याच्या पलंगाच्या आजूबाजूला कायम पसारा असायचा. मार्कने हार्वर्डमध्ये येताच केवळ दोन वर्षात 'कोर्स मॅच' ही वेबसाईट केवळ गमतीखातर तयार केली होती. ही वेब साईट वापरणारा विध्यार्थी कोणत्याही विषयाच्या तासामध्ये इतर कोणते विद्यार्थी हजर असणार, हे पाहून त्या तासांना आपणसुद्धा हजेरी लावायची कि नाही हे ठरवू शकत असत. यातून कोणत्या सुंदर मुली कोणत्या तासांना बसणार आहेत, याचा अंदाज घेऊन मुलं त्या तासांना हजेरी लावत असत. यासाठी कोणत्या मुलीने कोणते विषय निवडले आणि ती कोणत्या तासांना हजर राहणार आहे, हे मुलं त्यातून तपासत असत. ही वेबसाईट हार्वर्ड विद्यापीठात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली.  'कोर्स मॅच' या वेब साईटची कल्पना मार्कला आधीच्या 'बडी झू' या वेब साईटवरून सुचली होती. एडम डीएंजलो या मार्कच्या मित्रानेच 'बडी झू' ही वेब साईट बनवली होती. सुरवातीला तीही साईट बरेच विद्यार्थी वापरायचे. नंतर एडमला त्या वेबसाईटमध्ये जास्त दम वाटला नाही म्हणून त्याने ती बंद केली. पुढे फेसबूक मोठी झाल्यावर तिथं एडम डीएंजलोनं तंत्रज्ञान विभागाचा प्रमुख म्हणून काम बघणं चालू केलं, तसेच  इंजिनीरिंग विभागाचा प्रमुख म्हणूनही काम बघितलं. पुढे म्हणजेच काही दिवसापूर्वी (या सहा-सात वर्षात) फेसबूकमधून बाहेर पडून एडम डीएंजलोनं स्वतःची 'क्वोरा' नावाची सोशल नेटवर्किंग  साईट असलेली कंपनी चालू केली.

कोर्स मॅचच्या यशामुळे मार्कच्या डोक्यात नवनव्या कल्पनांचं वादळ उठलं. मार्कने कोर्स मॅचमध्ये 'हॉट ऑर नॉट' या नावाच्या कार्यक्षमतेची भर घातली, गेम बनवली होती. ज्यामध्ये मुलामुलींचे फोटो अपलोड करून, त्यामधे तुलना होत असत आणि युझर्सकडून मिळालेल्या रेटिंगमधून चांगला फोटो निवडला जात असत. या साईटला 'फेसमॅश' असे नाव होते. ही वेब साईट कशी वाटते? ती नीट चालते का? त्यात काय दुरुस्त्या हव्या आहेत का? हे जाणून घेण्यासाठी या वेब साईटची लिंक त्याने ई-मेलद्वारे मित्रांना पाठवली, परंतु या वेबसाईट मधल्या चुका काढायचयं सोडून ही वेब साईट मार्कचे मित्र एकामागून एक नुसते वापरातच सुटले. तसेच ती लिंक त्या मित्रांनी त्यांच्या इतर मित्रांनाही पाठवली. असं करत 'फेसमॅश' ही वेबसाईट आख्या हार्वर्ड विद्यापीठात अगदी झपाट्याने लोकप्रिय झाली. बऱ्यापैकी सगळे विद्यार्थी ही वेबसाईट अगदी मनसोक्त वापरत होते, परंतु मार्कला मात्र याची कल्पना नव्हती.  ही साईट कॉलेज कॅम्पसच्या इंट्रानेटमधे जोरात पसरली, परंतु काही कारणास्तव हार्वर्ड विद्यापीठाने ती बंद केली. नंतर राहुल जैन या उद्योगपतीकडून फेसमॅश.कॉम ही साईट ३०२०१ अमेरिकन डॉलर्सला  विकली गेली. पुढे हार्वर्ड विद्यापीठाचे मार्क झुकरबर्गने फोटो अपलोड करून शेअर करण्यासाठी नवीन साईट बनवण्याचे एक प्रकारचे आव्हानच स्वीकारले. तो 'दी फेसबूक डॉट कॉम' (TheFacebook.com) या वेब साईटसाठी कोड लिहू लागला. 

मार्क झुकरबर्गने २००४ च्या जानेवारी महिन्यात 'दी फेसबुक डॉट कॉम' या वेबसाईटची नोंदणी केली. फेसबुक हा शब्द हार्वर्ड विद्यापीठाच्या एका पुस्तिकेवरून आला, तिथे नवं शैक्षणिक वर्ष सुरु झालं कि सगळ्या विद्यार्थ्यांचा एकमेकांना परिचय सहजपणे करून घेता यावा यासाठी नव्या विद्यार्थ्यांची थोडक्यात माहिती असलेली आणि त्यांचा फोटो असलेली एक पुस्तिका असायची. त्या पुस्तिकेचं नाव फेसबुक होतं. मार्कच्या म्हणण्यानुसार या वेबसाइटची कल्पना त्याच्या आधीच्या 'कोर्स मॅच' आणि 'फेसमॅश' या दोन वेबसाईटवरून, तसेच 'फ्रेंडस्टार' या सोशल नेटवर्किंग साईटवरून आली. त्यावेळी फ्रेंडस्टार, मायस्पेस यासुद्धा फेसबूकप्रमाणे सोशल नेट्वर्किंग साईट्स होत्या. फेसमॅशमध्ये मार्कने  विद्यार्थ्यांची माहिती स्वतः गोळा करून भरली होती, 'दि फेसबुक डॉट कॉम'मध्ये मात्र मार्कने माहिती भरण्याची सोय विद्यार्थ्यांसाठीच करून दिली. म्हणजेच माहिती भरण्याला विद्यार्थीच सहमत असतील आणि माहितीचा गैरवापर झाला, तर तो आरोपही मार्कवर राहणार नाही कारण फेशमॅश साइट बनवताना मार्कला कॉपीराइट्स कायदा भंग केल्याच्या वादालाही सामोरं जाव लागलं होतं. विद्यार्थ्यांकडूनच माहिती भरण्याविषयीचा मार्कचा निर्णय पुढेही फेसबुकसाठीही खूप महत्वाचा ठरला.

त्यावेळी हार्वर्डच इंटरनेट खूप हळू चालायचं. बऱ्याच विद्यार्थ्यांनी याबद्दल तक्रारही केली होती. त्यामुळे मार्कने ही वेबसाईट एका कंपनीला भाड्याने चालवायला दिली. ८५ अमेरिकन डॉलर्स इतकं भाडं देऊन त्या कंपनीच्या सर्वरवरून ही वेबसाईट चालवली जात होती. काही कालांतराने 'दि फेसबुक' वेबसाईट यशस्वी होईल असं मार्कला वाटायला लागलं. यातून पैसे कसे कमवायचे याकडे त्याच लक्ष वळलं आणि या विचाराने त्याला भेडसावून सोडलं. यासाठी त्यानं एदुआर्दो सव्हेरीन नावाच्या एका वर्गमित्राला सहभागी होण्याविषयी विचारलं. त्याला उद्योगधंद्यातील चांगली जाण होती. या दोंघांनी १००० अमेरिकन डॉलर्स ओतून 'दि फेसबुक डॉट कॉम' सर्वांसाठी खुली करण्यात आली. मार्कने ४ फेब्रुवारी २००४ या दिवशी 'दी फेसबूक' साईट लाँच केली. या साईटमध्ये सहभाग घेताना हार्वर्डचा ई-मेल आय-डी असणं गरजेचं होतं. फेसमॅशपेक्षा ही साईट विध्यार्थ्यांना जास्त सुरक्षित वाटत होती. कारण यात मार्कने मागच्या त्रुटी दुरुस्त केल्या होत्या आणि माहितीसाठी हार्वर्डनेही काही बंधनं घातली होती. आपली माहिती कुणाला दिसावी किंवा दिसू नये अशा बऱ्याच सोयी मार्कने यात वाढवल्या होत्या.

ही वेबसाईट डेटिंगसाठी बनवलेली नसली तरी विद्यार्थी एकमेकांना भेटीसाठी साईटचा वापर होत गेला. नवीन विद्यार्थी तर याचा वापर जोरात करू लागले. याबरोबरच 'दि फेसबुक डॉट कॉम'चा वापर विधायक कामासाठीही करायचयं ठरलं. उदाहरणार्थ, आभ्यासामधल्या शंका सोडवणं, एकत्र जमून एकाद्या विषयावर चर्चा करणं. याबरोबर क्लब्ज, पार्ट्या यासाठीही साईट वापरली जाऊ लागली. बरेचजण मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी याचा वापर करत असत. वेबसाईटवर नाव नोंदवण्याचे प्रमाण विलक्षण वाढले. दी फेसबुकची अशी प्रचंड वेगानं वाढ होत असल्यामुळं आपल्या एकट्याला याचा डोलारा सांभाळता येणार नाही असं मार्कच्या लक्ष्यात आलं. त्यामुळे मार्कने हार्वर्डमध्ये आपला रूममेट असलेल्या डस्टीन मॉस्कोविजला एकूण भांडवलापैकी ५ टक्के वाटा देवू केला. पुढे मार्कने अशीच विभागणी करत ६५ टक्के वाटा स्वतः कडे ठेवत ३० टक्के सॅव्हेरिनकडे ठेवला आणि मॉस्कोविजला ५ टक्के दिला. सुरुवातीलाच ही वेबसाईट हार्वर्डपुरती मर्यादित न ठेवण्याचं मार्कने ठरवलं होतं. विद्यार्थ्यांना आता इंटरनेटवरूनच प्रवेश मिळावा अशा हार्वर्डला ई-मेल्स  येत असत आणि मार्कलाही हेच हवे होते.  पुढे ही वेबसाईट इंटरनेटवर लाँच करण्यात आली. या कामात मॉस्कोविजने बरीच मदत केली. पुढे बाकीच्या विद्यापीठाचे, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थीही 'दी फेसबुक डॉट कॉम'चा वापर करू लागले. इतर विद्यापीठामध्ये या साईटचा प्रचार करत असताना दिसून आलेली मार्कची हुशारी आणि त्याला असलेली व्यवसायाची जाण या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत.

मार्कने विद्यापीठाचीही वेबसाईट बनवली ज्यामध्ये विद्यापीठातील सर्व लोक एकमेकांशी जोडले जाऊ शकत असताना याबरोबरच दुसऱ्या बाजूला  स्टानफोर्ड, डार्टमाउथ कोलम्बिया, कोर्नेल आणि येल या विद्यापीठांमध्ये  त्यांच्या स्वतंत्र  साईटचा प्रचार चालू केला होता. या सोशल नेटवर्किंग साईट येवढ्या खास नव्हत्या, त्यात फेसबूकसारख्या सोयी-सुविधा नव्हत्या, तेव्हा तिथेपण फेसबूकने वेगाने भरारी घेतली. हार्वर्डच्या सामाजिक संपर्कांमधून इतर शाळा, कॉलेजमध्येही याचा प्रसार तर होतच होता. या साईट्सच्या पूर्णतेनंतर केवळ सहा महिन्यातच कॉलेजचे तीन सिनिअर विद्यार्थी दिव्य नरेंद्र, कॅमेरॉन विंकलवॉस, टेलर विंकलवॉस त्यांच्या 'हार्वर्डकनेक्शन डॉट कॉम' (HarvardConnection.com) या वेबसाईटसाठी मदतीसाठी मार्कला यांच्या टीममध्ये आमंत्रित करत होते.

हार्वर्डचे  विद्यार्थी दिव्य नरेंद्र, कॅमेरॉन विंकलवॉस, टेलर  विंकलवॉस यांनी मार्कवर धोका दिल्याचा आरोप केला की तो हार्वर्डकनेक्शन डॉट कॉम नावाच्या एका सामाजिक नेटवर्क साईटमध्ये मार्क मदत करेल, परंतु लिहून दिल्याप्रमाणे मार्कने त्यांना मदत केली नाही. यावर त्यांनी २००४ मध्ये एक  न्यायालयीन खटला चालवला  परंतु  २८ मार्च २००८  ला मार्कच्या प्रतिकूल पुराव्यामुळे तो बर्खास्त केला गेला. त्याच्याही अगोदर  बोस्टनमध्ये  अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयामध्ये हाच खटला वारंवार फाईल करण्यात आला होता. २५ जुलै २००८ ला पहिली सुनावणी झाली, सुनावणीमध्ये न्यायाधीशांनी हार्वर्डकनेक्शनला सांगितले की तक्रारीत  काही मुद्दे टाकून पुन्हा केस फाईल करा आणि पुन्हा २५ जून २००८ ला सुनावणी झाली आणि निकाल लागला आणि दी फेसबुक कंपनी हार्वर्डकनेक्शनला  ६५ दसलक्ष अमेरिकन डॉलर्स  शेअर द्यायला तयार झाली.

मार्क झुकरबर्गबरोबर  मॉस्कोविज, पालो आल्टो आणि अन्य सहकारी  कॅलिफोर्नियाला  गेले. तिथं त्यांनी  भाड्यानं छोटं घर घेतलं जे  त्यांचं पहिलं  ऑफिस ठरलं. सुरुवातीला काही महिने 'दी फेसबूक' फ्लोरिडा नावाने चालू राहिली.  पीटर थिएल या मार्कच्या मित्राने फेसबुकसाठी बराच पैसा लावला. पुढे एडुआर्डो सेव्हरिन याही मित्राने बराच पैसा लावला आणि  दिवसेंदिवस  फेसबुक वाढत चालली. पीटर थिएल यांनी ५००००० अमेरिकन डॉलर्स इतका पैसा एंजल इन्व्हेस्टमेंट या कंपनीच्या माध्यमातून जोडला गेला. हा पैसा फेसबूकच्या १०.२ % इतका होता. पुढे पेपल, नॅपस्टर याही कंपन्यानी काही पैसा गुंतवला. करारामध्ये काही कंपन्यानी अशा काही अटी घातल्या की जर फेसबूकचे युझर्स वाढले नाहीत तर ते पैसा काढून घेतील. परंतु तसे काही घडले नाही. फेसबुकचे युझर्स वाढतच गेले किंबहुना आजही वाढत आहेत.

२४ ऑक्टोबर २००७ ला फेसबुकचा मायक्रोसॉफ्टशी करार झाला, फेसबुकच्या २४० दसलक्ष डॉलर्समधील १.६ % शेअर्स मायक्रोसॉफ्टने घेतले.  म्हणजेच १५ अब्ज डॉलर्सचे शेअर्स मायक्रोसॉफ्टकडे आहेत. फेसबूकने पुढे 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणून योजना चालू केली, ज्यामध्ये अनेक कंपन्या फेसबूकमध्ये पैसा गुंतवू लागल्या. त्याचा अनेक कंपन्यांना फायदा होत गेला. अनेक कंपन्यांचे शेअर्स वाढले. यामध्ये याहू, गुगल, ऍपल, ऍमेझॉन अशा अनेक मोठ्या कंपन्यांचा सहभाग आहे. २००९ मध्ये फेसबुकने सर्व सोशल मिडिया साईट्सचे रेकॉर्ड तोडले. फेसबुक जगातील सर्वाधिक वापरली जाणारी सोशल मिडिया साईट बनली. सध्याच्या घडीला फेसबूकमध्ये केवळ २०६५८ कर्मचारी काम करतात. जो आकडा मोठ्या कंपन्यांच्या तुलनेने खूप कमी आहे. २०११ साली फेसबूकचे मुख्य कार्यालय मेनलो पार्क, कॅलिफोर्नियाला स्थलांतरित झाले.

आजतागायत फेसबूकचे अर्थकारण खूप मोठे आहे. ८४.५२४ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतिकी ही मोठी कंपनी आहे. फ्रेंडफीड, कनेक्टयू , फ्रेंडस्टार पेटंट, नेक्सटॉप, चाय लॅब्स, शेअर ग्रूअ अशा अनेक कंपन्या फेसबुकने विकत घेतल्या. २०१२ साली शर्लिन सँडबर्ग यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. सध्याचे फेसबूकचे मुख्य कार्यालय कॅलिफोर्नियामध्ये आहे. दिवसेंदिवस फेसबूक आपल्या साईटमध्ये आणि ऍपमध्येही चालणाऱ्या कार्यक्षमतांमध्ये वैशिष्ठपूर्ण बदल करतच राहते. जे युझर्सच्या दृष्टीने महत्वपूर्ण बदल असतात. २०१४ मध्ये फेसबूकने वॉट्सअप मेसेंजर ही कंपनी १९ अब्ज अमेरिकन डॉलर्सला विकत घेतली त्यामुळेच फेसबूक आणि वॉट्सअपमध्ये अनेक नाविन्यपूर्ण बदल होत गेले. असाच करार फेसबूक आणि इंस्टाग्राममध्येही झालेला आहे, इंस्टाग्राम १ अब्ज डॉलर्सला विकत घेतली गेली. कनेक्टयु ३१ दसलक्ष डॉलर्सला, फ्रेंडफीड ४७.५ दसलक्ष डॉलर्सला, फ्रेंडस्टार ४० दसलक्ष डॉलर्सला, फेस डॉट कॉम १ अब्ज डॉलर्सला अशा अनेक कंपन्या फेसबूकने विकत घेतल्या आणि काही कंपन्या विकत घेतल्याच्या किमती फेसबूककडून गोपनीय ठेवल्या गेल्या आहेत. आज प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या फेसबूकबरोबर अनेक लहानमोठ्या कंपन्या पैसा गुंतवतच असतात. अनेक लघुउद्योगांना फेसबूकवरून स्वतःच्याही बिझनेसचा प्रसार करता येतो. राजकारणातील प्रचारासाठीही फेसबूकसारख्या सोशल मिडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. आजही अनेक कंपन्या जाहिरातीसाठी पैसा गुंतवत आहेत. फेसबूक एक सोशल मिडिया साईट तर आहेच, परंतु छोट्या कंपन्यांची वाढ होण्यासाठी एक व्यासपीठसुद्धा आहे. मागच्या चार-पाच वर्षात फेसबूकने आर्टिफिशिअल इंटीलिजन्सच्या बऱ्याच कार्यक्षमतांची भर घातली आहे. युजर्ससाठी चॅटिंग, फोन कॉलिंग, व्हिडीओ कॉलिंग असे अनेक बदल  घडवून आणले आहेत.

फेसबुकने चॅटिंगसाठी स्वतंत्र मोबाईल ऍप बनवले आहे. त्यास फेसबूक मॅसेंजर म्हणून ओळखले जाते. या ऍपनेही कमी वेळात जास्त प्रसिद्धी मिळवली आहे. सध्याच्या स्मार्टफोन मोबाईलच्या तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे फेसबूक ऍपचा, फेसबूक मेसेंजरचा वापर वाढत आहे. मेसेंजरबरोबरच फेसबुक वॉच हेही फेकबुकचे व्हिडिओ पाहण्यासाठीचे एक उत्पादन आहे. हे ९  ऑगस्ट २०१७  या दिवसापासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. व्हिडिओ पाहताना युवजर्सला जाहिरात दाखवून फेसबुक पैसा कमवू लागली. टाईमलाईन इव्हेंट्स, फोटो, व्हिडीओ असे बरेच काही फेसबूकच्या माध्यमातून शेअर करता येते. ऑर्कुट, फ्रॉपर, मायस्पेस, सिक्सडीग्रीज, हायफाय अशा अनेक सोशल नेट्वर्किंग साईट्सनी फेसबूकपुढे अक्षरशः मान टाकली. फेसबूकसारख्या साईट्समुळे सामान्य नागरिकही पत्रकार बनला, असे म्हणायला हरकत नाही. तो आपल्या व्यक्तीस्वातंत्र्याचा वापर करून अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकतो. अर्थात फेसबूकमुळे सामाजिक जागरूकता वाढत आहे, दुसऱ्या बाजूला त्याचे काही प्रमाणात तोटे असतानादेखील फेसबूकने सकारात्मक दृष्टीने जग बदललं म्हणायला हरकत नाही. २६ वर्षीय मार्क झुकरबर्गला २०१० ला अमेरिका टाईम्सकडून 'पर्सन ऑफ दी ईअर'चा पुरस्कार देण्यात आला.  जग बदलून टाकण्यासारखं काही करायची संधी असताना शिकत बसण्यात काय अर्थ आहे? स्वतःला  असा प्रश्न वयाच्या १९-२० वर्षी विचारणाऱ्या मार्क झुकरबर्ग नावाच्या विलक्षण बुद्धीच्या, प्रचंड इच्छाशक्ती असणाऱ्या अमेरिकन युवकानं फेसबूक नावाची वेबसाईट सुरु केली आणि बघता बघता ती जगव्याप्ती झाली. जवळजवळ दोन अब्ज लोक फेसबूकचे युजर्स आहेत म्हणजेच काही देशाच्या लोकसंखेपेक्षा फेसबूकचे जास्त नागरिक आहेत असं आपण म्हणू शकतो. भविष्यातही फेसबूक अनेक नाविन्यपूर्ण बदल आणतच राहील यात शंका नाही.

Published in Masik Sahitya Chaprak, Pune. December 2019.