Search in Google

Wednesday, November 20, 2019

भविष्यातले तंत्रज्ञान - भाग ३

आता सध्या आपण आपल्या मोबाईलशी बोलून एकदा व्हिडीओ लावण्यासाठी, मेसेज पाठवण्यासाठी, कॉल करण्यासाठी सांगतो. अर्थात हेही आर्टीफिसिअल इंटीलिजन्स आहे. तुम्ही जर तुमच्या मोबाईलला एखादी गोष्ट सांगितली आणि ती नमूद करून ती मोबाईलने क्रिया पार पाडली कि ती मशीन लर्निंगची संकप्लना होते. समजा  तुम्ही जर मोबाईलला सांगितले "प्लिज नोट, मार्क इज माय डॅड." आणि काही दिवसांनी तुम्ही मोबाईलला सांगितले "प्लिज कॉल माय डॅड." तर तो बरोबर मार्कला फोन लावून देतो.

आजपर्यंत जितके शोध लागले आहेत,  भविष्यात होणाऱ्या संशोधनाला धरून हे शोध त्याच्या १ टक्केदेखील नाहीत.  आपल्याला विचारही करवत नाही, भविष्यात असे बरेच शोध लागतील. अर्थात माणूस विचार करतो म्हणजे नेमके काय करतो? माणसाच्या मेंदूत काहीतरी संकेत निर्माण होतात. वेगवेगळ्या मानवी विचारांची विशिष्ठ फ्रीक्वेसी असते. मेंदूशी संबंधित अनेक न्यूरॉन्स आणि मज्जातंतू संस्था शरीराला एक प्रकारचा सिग्नल पाठवत असते.  हेच सिग्नल्स घेऊन आर्टिफिशिअल इंटीलिजन्सची सुरुवात होते. एखादा व्यक्ती काय विचार करतो हेही आता समजू शकत आहे. डोक्यातून बाहेर पडणारी फ्रीक्वेसी पकडून एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करायची असल्यास तो केवळ विचार करून तो ती करू शकतो.


एखाद्या मूक-बधीर व्यक्तीसाठी हे तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त आहे. यात सिग्नल्स पकडण्यासाठी डोक्याला इलेक्ट्रोड्स लावले जातात. मेंदूवरील इलेक्ट्रोड्स संगणकाद्वारे बोलल्या जाणाऱ्या शब्दांमध्ये ब्रेनवेव्हचे भाषांतर करण्यासाठी वापरले जातात. जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपला मेंदू मोटर कॉर्टेक्सकडून आपला जबडा, ओठ आणि स्वरयंत्रात असलेल्या स्नायूंना त्यांच्या हालचालीत समन्वय साधण्यासाठी आणि ध्वनी निर्माण करण्यासाठी सिग्नल पाठवते.

सकारात्मक, नकारात्मक आणि असे लाखो विचारांचा सिग्नल्स पकडून डिकोड करणे ही गोष्ट खरी खूप आव्हात्मक असली तरीही हे सिद्ध करण्याचे अनेक प्रयोग होत आहेत, एका प्रयोगामध्ये या संशोधकाच्या पथकाने एका व्यक्तीला कोणतेही आवाज न बोलता त्यांचे तोंड हलवून बोलण्याची नक्कल करण्यास सांगितले आणि  ती यंत्रणा बोलल्या गेलेल्या शब्दांप्रमाणे कार्य करत नव्हती, परंतु तरीही ते गोंधळलेल्या शब्दांमधून काही समजण्यायोग्य शब्द डीकोड करत होती. आता असे तत्सम ऍलॉगरिथम्स तयार केले जात आहेत की ज्यातून मेंदूच्या सिग्नलला थेट ध्वनीमध्ये डीकोड करण्याचा प्रयत्न केला जाईल.

यातले मनुष्याचे ध्येय म्हणजे कसलेही दुष्परिणाम न होता सर्वसाधारणपणे मेंदू-प्रेरित संकल्पनांचा उपयोग करून कृत्रिम बुद्धिमत्ता वाढविणे हे आहे. याउलट, मेंदूचे विचार समजण्यासाठी किंवा त्यासाठी मदत करण्याकरता आम्हाला कृत्रिम बुद्धिमत्ताच वापरावी लागेल आणि याचा मूक-बधीर व्यक्तींना संपर्क साधण्यासाठी मोठा फायदा होईल.