स्व. राजीव गांधी यांनी बऱ्याच औद्योगिक क्षेत्रांना प्राधान्य देत आय. टी. इंडस्ट्री भारतात आणली, अर्थात ही एक प्रकारची क्रांतीच होती. यामुळेच राजीव गांधी यांना 'भारतीय दूरसंचार क्रांतीचा आणि माहिती तंत्रज्ञानाचा जनक ' म्हणून सन्मानित केले जाते. त्यांना डिजिटल इंडियाचे आर्किटेक्ट म्हणूनही ओळखले जाते. राजीव गांधींनी विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि संबंधित उद्योगांना प्रोत्साहन दिले आणि अशा उद्योगांवर विशेषतः संगणक, एअरलाइन्स, संरक्षण आणि टेलिकम्युनिकेशन्सवरील आणि आयात कोट्यावरील, कर आणि शुल्क कमी करण्याचा हा एक मार्ग होता. पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी १९८६मध्ये देशातील उच्च शिक्षण कार्यक्रमांचे आधुनिकीकरण आणि विस्तार करण्यासाठी राष्ट्रीय धोरणे (एनपीई) जाहीर केली, ज्यामुळे ग्रामीण भागातील उत्तम गुणवत्तेचा फायदा होईल आणि याचा बऱ्याच तंत्रज्ञानाचा भारताला फायदा झाला आणि त्यातून इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञानाच्या शिक्षणसंस्थांचा खऱ्या अर्थाने उदय झाला.
राजीव गांधीच्या युगाच्या अगोदर भारतीय सरकार किंवा भारतीय उद्योग माहिती तंत्रज्ञानाच्या संकल्पनेशी परिचित नव्हता. राजीव गांधींनी जाणले होते की भारत कनेक्टिव्हिटीच्या काळाच्या युगात आहे म्हणूनच सी-डीओटी Centre for Development of Telematics (C-DOT) ने देशभरातील दूरसंचार नेटवर्कची स्थापना केली. सॅम पितरोडा (राजीव गांधींचे सल्लागार) कॉइन-ड्रॉपिंग पब्लिक कॉल ऑफिस (पीसीओ) ची संकल्पना देखील सादर केली, ज्यामुळे दूरसंचार उद्योगाच्या वाढीस मदत झाली. १९८७ मध्ये, पंतप्रधान राजीव गांधी यांचे मुख्य तंत्रज्ञान सल्लागार म्हणून पितरोडा यांच्या काळात त्यांनी भारताच्या दूरसंचार आयोगाची स्थापना केली. सरकारने संगणकांवर नियंत्रण काढले आणि प्रोसेसरसह पूर्णपणे एकत्रित मदरबोर्ड आयात करण्याची परवानगी दिली ज्यामुळे संगणकांच्या किंमती कमी झाल्या. त्यानंतर, १९९५मध्ये तत्कालीन सार्वजनिक क्षेत्रातील विदेश संचार निगम लिमिटेडने सार्वजनिक प्रवेशासाठी एकाधिकाराने भारताची प्रथम इंटरनेट सेवा सुरू केली.
तंत्रज्ञान आधुनिकीकरण करण्यासाठीच्या लिलावाच्या धोरणाचा भाग म्हणून १९९१ मध्ये दूरसंचार सुधारणांसाठी पुढाकार घेतला. १९९७ मध्ये सरकारी हस्तक्षेप कमी करण्यासाठी भारतातील दूरसंचार नियामक प्राधिकरण (टीआरएआय) ची स्वतंत्र नियामक संस्था स्थापना केली गेली. काही अमेरिकन आणि युरोपियन कंपन्यांशी दूरसंचार करासाठी भागीदारी झाली. भारतीय कंपन्या स्थापन होऊन टेलिकॉमसह सॉफ्टवेअर निर्मितीत उतरल्या.
लिबरलायझेशनने १९९८ मध्ये २.३३% ते २०१४मध्ये ७४.५% इतकी वाढ केली आहे. Telecom Regulatory Authority of India (TRAI) ट्रायच्या मते, मोबाईल ग्राहक १९९८मध्ये ०.८८ दशलक्षवरून वाढून ९३३ दशलक्ष झाला आहे. केपीएमजी इंडियाचे भागीदार जयदीप घोष म्हणाले की, सुधारणेमुळे लोकांचे जीवन बदलले आहे. "मोबाइल प्रवेशाच्या दर १०% वाढीमुळे जीडीपीमध्ये १.२% वाढ झाली आहे. आणि ब्रॉडबँड प्रवेशामध्ये दर 10% वाढीसाठी, जीडीपी १-१.२ टक्क्यांनी वाढतो."
भारताला अजून बरेच काही करण्याची गरज आहे. अर्थात राजीव गांधींनी जी क्रांती आणली ती आज मोठे रूप धारण करत आहे आणि मुख्यत्वे हाच पाया मानून भारत एक टेलिकॉम आणि सॉफ्टवेअर निर्मितीतील सुपर पावर म्हणून ओळख निर्माण करत आहे.