Search in Google

Tuesday, July 23, 2019

आर्यांची दिनचर्या : जगण्याला दिशा देणारे पुस्तक - Book Review

या वर्षात मी अनेक पुस्तके वाचली. त्यातच 'आर्यांची दिनचर्या' हे पुस्तक हाती पडलं. एकदा हातात घेतलं आणि कधी वाचून संपलं समजलंही नाही आणि जवळ एक-दीड वर्षांनी मला एखाद्या पुस्तकाचं समीक्षण करावसं वाटलं. खरं तर हे पुस्तक नसून निरोगी आणि सुखी जीवन जगण्याचा मूलमंत्र आहे. आपले सर्वात मोठं धन म्हणजे 'आपले आरोग्य' होय. आरोग्य आहे तर सर्व काही आहे आणि हे आरोग्य जपण्यासाठी आपल्याला काही फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. सर्व उपाय आपल्याजवळच असतात. अर्थात  निरामय आरोग्य व समृद्ध चौफेर जीवन जगण्यासाठी दिशा देणारे हा ग्रंथ आहे.

सामाजिक आरोग्याच्या सुदृढतेचा विचार करून या ग्रंथाची मांडणी झाली आहे. आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे. पोषण, आहार, व्यायाम, स्वच्छता, इतरांशी व्यक्तिगत संबंध या गोष्टी आरोग्यावर परिणाम करतात. एखादा आजार होऊन बरा करण्यापेक्षा तो होवूच नये याची उपाययोजना यात सांगितली आहे.

आपल्या दिनचर्येबरोबर सामान्य औषधी उपचार, निसर्गोपचार, वनस्पती, गुणधर्म, मुळव्याध, अग्निमांद्य, दमा, सामान्य ज्वर, नेत्ररोग, त्वचारोग, कर्णरोग, दंतरोग व स्त्रीरोग यांची चिकित्सा ईत्यादी विषयांवर स्वनुभाविक व सुलभ औषधयोजनांची पुस्तकातील माहिती अतिशय उपयुक्त आहे. मी या पुस्तकाला केवळ  'घराचा वैद्य' अजिबात बोलणार नाही कारण हे पुस्तकात फक्त उपचार सांगितले नाहित तर जगण्याची सकारात्मकता दाखवत वाचकांना प्रोत्साहित करते. यात अनेक लोकांचे अनुभव आहेत. काही लोकांचे तर आजार बरे होणे शक्य नव्हते असेही अनेक आजार कीर्तनकार ह. भ. प. डॉ. दत्तोपंतबुवा पटवर्धन यांनी बरे केले आहेत.

गरोदर असताना स्त्रियांनी काय काळजी घ्यावी, दुध येण्यासाठी काय काळजी घ्यावी. यात विद्यार्थी, वृद्ध, तरुण, स्त्रिया आशा सर्वच गटातील लोकांसाठी उपयुक्त माहिती आहे. शारीरिक व्याधीचे नैसर्गिक आणि साधेपणाने उपचार कसे करावेत याबाबतचे अनुभवजन्य विश्लेषण बुवांनी या पुस्तकाच्या माध्यमातून अत्यंत साध्या, सोप्या भाषेत केले आहे.

या पुस्तकातले अनेक आचार म्हणजे दिनचर्या. दैनंदिन व्यवहारात मनुष्याने वागावे कसे ? प्रत:काळी उठल्यापासून रात्री निद्रा घेईपर्यंतचे जीवन कसे घालवावे हे आचाराच्या धार्मिक चौकटीत बसवून दिलेले आहे परंतु हे आचार आपले जीवनसैख्य, आयुष्य, बल, तेज वाढविणार कसे आहेतयाचे तरुणांनी ज्ञान करून घेतले तर आपल्या जुन्या आचारासंबधी झालेले गैरसमज दूर होऊन त्याप्रमाणे वागणारा दीर्घायू, तेजस्वी आणि सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. हे या पुस्तकात सांगितले आहे. 

वाई येथील आद्य राष्ट्रीय कीर्तनकार आणि लेखक ह. भ. प. डॉ. दत्तोपंतबुवा पटवर्धन यांचे वाचनीय आणि अनुकरणीय पुस्तक. १९५६ नंतर या या पुस्तकाची गरज का पडते आहे हे चपराकने ओळखले आणि हे पुस्तक पुन्हा प्रकाशित केले आहे. सर्वांनी हे पुस्तक वाचून आपले जीवनशैली निरोगी आणि सकारात्मक उर्जेने भरून जगावे.

पुस्तक : आर्यांची दिनचर्या
लेखक : ह. भ. प. डॉ. दत्तोपंतबुवा पटवर्धन
प्रकाशक : चपराक प्रकाशन
संपादन : दिलीप कस्तुरे
किंमत : २०० रुपये.
या पुस्तकाच्या नोंदणीसाठी संपर्क: ‭7057292092
http://shop.chaprak.com/product/aryanchi-dincharya/