कोणताही देश भविष्यातही आपल्या संरक्षण दलात उत्कृष्ठ दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर वाढवत आपली ताकद त्यावरच ठरणार आहे. पक्षाच्या रुपात हेरगिरी करणारे ड्रोन, इतर अचूक आणि बेधक मारा करणारे मिसाईल्स, रोबोटिक्स अशा आजच्या तंत्रज्ञानामध्ये बदलणाऱ्या दिवसाप्रमाणे यामध्येही बदल होत जाणार आहे. भविष्यातले ड्रोनसुद्धा खूप ताकतीचे असतील, युद्धकाळात कोणताही देश याची संख्याही जास्त ठेवील, पक्ष्यांच्या थव्याप्रमाणे हे शत्रुराष्ट्रावर तुटून पडतील. सैन्यादालामध्ये मणूष्यबळ नसून रोबोट काम करतील, युध्द करतील.
मोठमोठ्या हॉटेलमध्ये ग्राहकांना वेटरऐवजी रोबोट अन्नसेवा पोहच करतील. जपानसारख्या देशातील काही शाळांमध्ये मुलांची हजेरी घेण्यासाठी आजही 'आर्टिफिशिअल इंटीलिजन्स'सारख्या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे, यासाठी उपकरणामध्ये विद्यार्थ्यांचा चेहरा ओळखण्याची अंमलबजावणी करण्यात आलेली असते. एवढेच नव्हे तर लॉन्ड्रीत कपड्याच्या घड्या करण्यापासून खेळांमध्ये मुलांबरोबर बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल यांसारखे मैदानी खेळ खेळण्यासाठी रोबोट असतील यात दुमत नाही.
संरक्षण दल , वैद्यकीय, हॉटेल मॅनेजमेंट, क्रीडा अशा अनेक क्षेत्रात 'आर्टिफिशिअल इंटीलिजन्स'सारख्या तंत्रज्ञानामुळे आजच्या कामाचा चेहरामोहरा बदलणार आहे. चीनमध्ये काही दिवसापूर्वी पार पडलेल्या ब्रेन-ट्युमरच्या ऑपरेशनच्या चाचणीत मनुष्य डॉक्टरांच्यापेक्षा रोबोट डॉक्टरांची अचूकता जास्त होती.
आर्टिफिशिअल इंटीलिजन्समुळे सुरक्षेसंबंधी आकडेवारी देखील उल्लेखनीय असणार आहे. अशाप्रकारे, २०२०पर्यंत जगभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये जवळपास १ अब्ज आर्टिफिशिअल इंटीलिजन्सद्वारा समर्थित पाळत ठेवण्याचे कॅमेरे असणार आहेत. ऑनलाईन सुरक्षेबाबत AI टूल्सने अंदाजे ८६% वेगवेगळ्या सायबर हल्ल्यांना प्रतिबंधित करणे अपेक्षित आहे.
सध्याच्या डेटा विश्लेषणावरून असे कळते कि, आर्टिफिशिअल इंटीलिजन्सद्वारे प्राप्त अंतर्दृष्टी वापरणारे व्यवसाय आणि जगाची अर्थव्यवस्था अनेक पटींनी पुढे जाण्याचा अंदाज आहे.
आर्टिफिशिअल इंटीलिजन्समुळे दैनंदीन जीवनात भेडसावणाऱ्या जगातल्या अनेक अडचणी दूर होणार आहेत, सेल्फ-ड्रिइविंग कारमुळे अपघात कमी होतील. अपंग व्यक्तीचे जे ज्ञानेंद्रिय निकामी झालेले असेल त्याला पर्याय आर्टिफिशिअल इंटीलिजन्स असेल. आपण कल्पनाही करू शकत नाही, असे बदल या तंत्रज्ञानाच्या क्रांतीत घडून येणार आहेत. तथापि, आज जे दिसत आहे की आर्टिफिशिअल इंटीलिजन्स मुख्यत्वे संगणक विज्ञानच्या क्षमतांचा विस्तार करण्यासाठी डिझाइन केलेले आहे, त्यांची सीमा निश्चित करण्यासाठी नाही. परंतु खरा उद्देश असा नसून, वैज्ञानिकांसाठी पुढचे पाऊल म्हणजे सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात AIचा विस्तार करणे आहे. संशोधकांनामोरील एक महत्त्वाचे कार्य म्हणजे सध्या असलेल्या आर्टिफिशिअल इंटीलिजन्सचे दुष्परिणाम, असलेल्या अनेक अडचणी यावंर स्पष्ट सिद्धांताच्या सहाय्याने मात करणे, हे आहे.