आजच्या तंत्रज्ञानाच्या दुनियेत आर्टिफिशियल इंटीलिजन्सने ज्याप्रकारे जोर धरला आहे तो विलक्षण आहे. विज्ञानामुळे दिवसेंदिवस दैनंदिन जीवनामध्ये मशीनचा वापर पूर्वीपेक्षाही जास्त होत गेला आणि दिवसेंदिवस मशीनमधेही सुधारणा होत गेल्या आणि आज आर्टिफिशियल इंटीलिजन्सयुक्त संगणकाचा, मोबाईलचा वापर वाढत आहे.
१ आर्टिफिशियल इंटीलिजन्स म्हणजे काय ?
'आर्टिफिशियल इंटीलिजन्स' म्हणजेच अर्थात कृत्रिम बुद्धीमत्ता. अर्थात कसलाही मानवी हस्तक्षेप न करता संगणकालाच स्वत:चेच नियोजन आणि समोर आलेल्या प्रश्नांची उकल करण्याची क्षमता उपलब्ध करून देणे म्हणजेच आर्टिफिशियल इंटिलिजन्स होय. कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकल्पना विज्ञानकथांमध्ये जास्त आढळत जरी असली तरी, सध्या ही संगणक अभ्यासक्रमामधील एक महत्त्वाची शाखा बनली आहे. १९५६ मध्ये अमेरिकेतील डार्ट-माऊथ कॉलेजमधील एका प्रोजेक्टमध्ये आर्टिफिशियल इंटीलिजन्स या संकल्पनेचा शोध लागला गेला. पुढे लेनिन आणि त्याच्या संशोधक सहकाऱ्यांच्या मदतीने कम्प्युटरचे एक विशिष्ठ नेटवर्क उभारण्याचे प्रयत्न केले होते. मानवी मेंदूमध्ये असणाऱ्या न्यूरॉनप्रमाणे नेटवर्क बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. केवळ आवाज, प्रतिमेची ओळख, भाषांतर यांद्वारे हे नेटवर्क हाताळले जाते. मनुष्य जसा विचार करतो, विचार करून असंख्य संभावनेतून कोणती कृती करायची? याचा जसा तर्क लावतो आणि नंतर कृती करतो किंवा एखाद्या क्रियेला प्रतिक्रिया देतो, अगदी अशीच कामे एखाद्या यंत्रांकडून करून घेणे त्यावेळी तसे आव्हानात्मक होते. आता ही सर्व कामे संगणकाकडून करून घेणे शक्य झाले आहे. हे सर्व शक्य होत आहे आर्टिफिशियल इंटीलिजन्सच्या सहायाने! कृत्रिम बुद्धिमत्ता मुख्यत: आटोमेशन म्हणजेच स्वयंचलित कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली बुद्धिमान वर्तणूक करू शकतील अशा कामांसाठी वापरली जाते. आर्टिफिशियल इंटीलिजन्सचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात. रूढ (कन्वेन्शनल ए. आय.) आणि संगणकीय (कंपुटेशनल ए. आय.) कृत्रिम बुद्धिमत्ता. रुढ कृत्रिम बुद्धिमत्ता ही यंत्रांचे शिक्षण व संख्याशास्त्र यांमध्ये विभागली जाते. ही बुध्दिमत्ता चिन्हांवर आधारित, तर्काधारित, सुयोजित असते. याला एक्स्पर्ट सिस्टीम असेही म्हणतात. या प्रोग्रामिंगला प्रचंड प्रमाणातील माहितीचे विश्लेषण करून उद्दिष्टांपर्यंत पोहोचवावे लागते, रूढ (कन्वेन्शनल ए. आय.) मध्ये उदाहरणावरून तर्क करणे, वर्तनावरून तर्क करणे याचाही समावेश होतो. रोबोट जरी आकृतीने माणूस दिसत नसला तरीही माणसाप्रमाणेच वागत असतो, माणसाप्रमाणेच काम करत असतो. तर संगणकीय (कंपुटेशनल ए. आय.) कृत्रिम बुद्धिमत्तेचे न्यूरल नेटवर्क, फझी सिस्टिम्स, इव्होलुशनरी कंपुटेशनल असे प्रकार पडतात. एखादा पॅटर्न तपासणे किंवा औद्योगिक व ग्राहकोपयोगी वस्तूंच्या निर्मितीमध्ये नियंत्रण करण्यासाठी किंवा जीवशास्त्रीय संकल्पनांचा उपयोग करून दरवेळी अचूक उत्तर शोधण्यासाठी कंपुटेशनल एआयचा उपयोग होतो.
२ आर्टिफिशियल इंटीलिजन्समुळे मानवी जीवन सोपे कसे होणार?
प्रत्येक क्षेत्रात अटोमेशन होत आहे परंतु त्याच वेगाने अटोमेशनच्या प्रक्रियेतही दिवसेंदिवस बदलही होत आहे. इमेज रेकग्निशन, फेस रेकग्निशन, व्हाईस रेकग्निशन या कामांमुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. यामुळे इंटरनेट विश्वातली सुरक्षितता वाढली आहे. फेसबुक, गुगल, मायक्रोसॉफ्ट यासारख्या मोठ्या कंपन्यांनी आर्टिफिशियल इंटीलिजन्ससारखं शस्त्र हाती घेवून दैनंदिन जीवण सोपे करण्यास सुरवातही केलेली आहे. बँकेमध्ये सुपर इंटीलिजन्सचा उपयोग व्यवहार सांभाळण्यासाठी, शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी तसेच मालमत्ता सांभाळण्यासाठी केला जातो. रुग्णालयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या प्रणाली या बिछान्यांचे वेळापत्रक तयार करणे, कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलत्या ठेवणे, वैद्यकीय माहिती देणे यासारख्या कामांकरिता वापरात आहेत, रोगाचे निदान करणे, शस्त्रक्रिया करणे यामध्ये रोबोट वापरले जाऊ लागले आहेत. आणि महत्वाचे म्हणजे सैन्य दलात आर्टिफिशियल इंटीलिजन्सचा वापर करून रोबोट आर्मी बनवली जात आहे. शिक्षण देण्यासाठीही आर्टिफिशियल इंटीलिजन्सचा वापर होऊ शकतो. अमेरिका, जपान, रशिया यासारख्या देशांमध्ये या मोहिमेला सुरुवातदेखील झाली आहे. इतर क्षेत्रात, मार्केटमध्येही खरेदी विक्रीसाठी आर्टिफिशियल इंटीलिजन्सचा वापर वाढत आहे. भविष्यात रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटीलिजन्स वापरून बनवलेल्या स्वयंचलीत वाहनामुळे ट्रॅफिकसाखा कठीण प्रश्न सुटला जाईल. अर्थात या सर्व संकल्पना प्रलंबित होत आहेत सध्याच्या नेटवर्क आणि इंटरनेट स्पीड यासारख्या अनेक येणाऱ्या अडचणींमुळे! आपल्या मोबाईलमधे एप्पल, मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सारख्या मोबाईल कंपन्यांनी दिलेले सिरी , गुगल असिस्टंट, कॉर्टेना यासारखे रोबोट आपण अनुभवत आहोत.
३ आर्टिफिशियल इंटीलिजन्सपुढील आव्हाने काय आहेत?
अटोमेशनमुळे निर्माण झालेल्या बेरोजगारांना नोकऱ्या देणे किंवा त्याच बेरोजगारांना शिक्षणाने तंत्रज्ञानात सक्षम करणे, जेणे करून तंत्रज्ञानात अजून काही नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणून उद्योगधंदे उभा राहीतील अशी तंत्रज्ञान शिक्षित पिढी तयार करणं, हे रोबोटिक्समुळे समोर आलेले सर्वात मोठे आव्हान असणार आहे. अर्थातच आज महासत्ता होण्याचे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी धडपडणाऱ्या भारतारख्या देशाला आर्टिफिशियल इंटीलिजन्स आणि रोबोट या संकल्पना प्रत्येक्षात उतरण्यात जे मनुष्यबळ लागते आहे, असे मनुष्यबळ तयार करणे हे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. अर्थात याचा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नसेल. अटोमेशनला धरून प्रत्येक क्षेत्रात प्रोसेस स्टॅन्डरडाईज करावी लागणे हेही एक आव्हान असणार आहे.
अटोमेशनमुळे निर्माण झालेल्या बेरोजगारांना नोकऱ्या देणे किंवा त्याच बेरोजगारांना शिक्षणाने तंत्रज्ञानात सक्षम करणे, जेणे करून तंत्रज्ञानात अजून काही नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणून उद्योगधंदे उभा राहीतील अशी तंत्रज्ञान शिक्षित पिढी तयार करणं, हे रोबोटिक्समुळे समोर आलेले सर्वात मोठे आव्हान असणार आहे. अर्थातच आज महासत्ता होण्याचे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी धडपडणाऱ्या भारतारख्या देशाला आर्टिफिशियल इंटीलिजन्स आणि रोबोट या संकल्पना प्रत्येक्षात उतरण्यात जे मनुष्यबळ लागते आहे, असे मनुष्यबळ तयार करणे हे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. अर्थात याचा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नसेल. अटोमेशनला धरून प्रत्येक क्षेत्रात प्रोसेस स्टॅन्डरडाईज करावी लागणे हेही एक आव्हान असणार आहे.
४ आर्टिफिशियल इंटीलिजन्समुळे काय नुकसान झेलावे लागेल?
आज बेरोजगारीचा प्रश्न सोडवत असताना त्यात आणखी भर पडण्याची भीती अनेक तज्ञांना आहे. स्पेसेक्स या कंपनीचे मुख्याधिकारी एलन मस्क यांनी आर्टिफिशियल इंटीलिजन्स ही संकल्पना मानव जातीला धोक्याची असल्याचे मत काही दिवसाखालीच देले होते. यांच्या मतानुसार एआयच्या माध्यमातून आपण धोक्याचा मार्ग पत्करत असल्याचे सांगितले होते. काही दहशतवादी आपली सायबर आर्मी बनवत असल्याची माहिती पुढे येते आहे. त्यात रोबोटिक्ससारखे धारदारी हत्यार दहशतवाद्यांच्या हाती पडले तर आणखी दहशतवाद वाढायला वेळ लागणार नाही. अशा गोष्टीला सामोरे जाणे हेही मोठे आव्हान असेल. काही सिनेमांमध्ये आपण हे चित्र पाहिले आहे, एक रोबोट खलनायक कसा बनतो आणि माणसाविरोधी कसे काम करतो. अर्थात स्वतः शिक्षण घेणारे रोबोट मनुष्यापेक्षाही हुशार होतील अशीही भीती आज तज्ञांना आहे.
या उलट काही शात्रज्ञांकडून हे मुद्दे खोडलेही जात आहेत, त्यांच्या मते, जेव्हा कंपन्यांमध्ये, कारखान्यांमध्ये एका-एका साध्या मशीनचा वापर होत चालला होता तेव्हाही बेरोजगारीचा प्रश्न आला होता, परंतु मनुष्याने त्यावरही मात केलेली आहे. आणि एआयमधे अजून ज्या काही सुरक्षतेच्या बाबींवर प्रभुत्व मिळाले नाही, काही दिवसांनी ते शक्य होईल. त्यामुळे जग आज आर्टिफिशियल इंटीलिजन्सला घेवून सकारात्मक वाटचाल करत असताना दिसत आहे आणि तंत्रज्ञानात घडून येणारी एक नवी क्रांती असेल.
Pubished in Dainik Surajya. Solapur.