Search in Google

Monday, April 29, 2019

महाराष्ट्र देशा!

जेव्हा कधी महाराष्ट्राबद्दल थोडेफार माहित असलेल्या अमराठी माणसाला सांगितले कि मी महाराष्ट्रातून आहोत, तेव्हा पटकन त्याच्या डोक्यात विचार येतो 'शिवरायांचा महाराष्ट्र'! याबरोबरच आज महाराष्ट्रात मुख्यत्वे हिंदू, बौद्ध, जैन, इस्लाम या धर्माचा वारसा घेत वाहणाऱ्या मराठी संस्कृतींचा ठसा आहे. महाराष्ट्र म्हंटलं कि संतांची भूमी,  शेतकऱ्यांची-वारकऱ्यांची भूमी, खेड्यांची भूमी, चळवळीची भूमी... महाराष्ट्र म्हंटलं कि मुंबई, पुणे... उद्योगांची भूमी...! महाराष्ट्र म्हंटलं कि खेळांची भूमी कब्बडी, कुस्ती, खो-खो!!  महाराष्ट्र म्हंटलं कि शिवराय, शाहू, फुले आंबेडकरांची भूमी! पुरोगामी इतिहासाची भूमी! संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार असलेल्या आचार्य अत्रे यांनी 'माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे, बाकीच्या राज्यांना फक्त भूगोल आहे', असे उद्गार काढले होते. 

पर्यटनाच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रेसर आहेच, महाराष्ट्रात अनेक उद्योग येत आहेत त्यामुळे मराठी माणसाचे उद्योगातही योगदान वाढत आहे. देशाला एकूण उत्पन्नापैकी २० ते २२ टक्के उत्पन्न केवळ महाराष्ट्र देतो.  आता आपण थोडं महाराष्ट्राबद्दलच्या कमी चर्चेत असणाऱ्या गोष्टींवर बोलूयात. देशाला जसे देश स्वतंत्र होताच राष्ट्रीय प्राणी, पक्षी, गीत, फुल या गोष्टी ठरवल्या जातात तशा या गोष्टी राज्यासाठीही लागू होतात, हे आपल्यापैकी खूप कमी जणांना माहिती असेल. 

राज्य गीत- जय जय महाराष्ट्र माझा
राज्य नृत्य-    लावणी
राज्य प्राणी    - शेकरु  ( मोठी खार: भीमाशंकरच्या जंगलात आढळते.)
राज्य पक्षी- हरियाल
राज्य फुल- ताम्हण (हिरव्या रंगाचा कबुतरासारखा दिसणारा पक्षी )
राज्य वनस्पती- आंबा
राज्य खेळ- कबड्डी
राज्य भाषा - मराठी
ताम्हण (हिरव्या रंगाचा कबुतरासारखा दिसणारा पक्षी )
       शेकरु  ( मोठी खार: भीमाशंकरच्या जंगलात आढळते.)
महाराष्ट्राबद्दलची आणखी काही माहिती-

सुमद्रकिनारा – ७२० किमी
नगरपालिका – २३०
महानगरपालिका – २६
शहरी भाग – ४०%
ग्रामीण भाग – ६०%
लोकसंख्येच्या बाबतीत २ रा क्रमांक
क्षेत्रफळात ३ रा क्रमांक
संपुर्ण साक्षर पहिला जिल्हा – सिंधुदुर्ग
सर्वात कमी साक्षर जिल्हा – नंदूरबार
महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या – मुंबई उपनगर
महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा – नंदूरबार
महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा – गडचिरोली
महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा – बीड
महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा – नंदूरबार
महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा – गोंदिया
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा – अहमदनगर
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा – मुंबई शहर
महाराष्ट्रातील उंच शिखर – कळसूबाई (१६४६ मी) कल्याण जवळ
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी – गोदावरी
महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग – न्हावाशेवा पळस्पे २७ किमी
पहिले मातीचे धरण – गंगापूर, गोदावरी नदीवर
महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा असलेले शहर – मुंबई
जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ – नागपूर
भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई

गुढी पाडवा, होळी, हरतालिका, गणेश चतुर्थी, दिवाळी, मकर संक्रांत हे महाराष्ट्राचे खास सण आहेत. या सणांसाठी खालील विशेष पदार्थ करतात:

गुढी पाडवा: कडूलिंब व गूळ व वाटली डाळ व मोड आलेल्या हरभर्यारची उसळ
होळी: पुरणपोळी
गणेश चतुर्थी: उकडीचे मोदक
दिवाळी: करंजी, चकली, शंकरपाळे, अनारसा
मकर संक्रांत : तिळगूळ, तीळवडी, पांढरा शुभ्र काटेरी हलवा.

महाराष्ट्राबद्दल आश्चर्यकारक वैशिष्ठ्ये

१. जगातील सर्वात मोठा कांदा बाजार महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि जवळजवळ प्रत्येक वर्षी जगभरातील अर्ध्या कांद्याचे उत्पादन एकटा नाशिक जिल्हा करतो.
२. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार लेक हे उल्का जमिनीवर पडल्यामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे भारतातील एकमेव तलाव आहे.
३. महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे सुसंस्कृत राज्य आहे, जिथे ५० % लोक केवळ शहरात राहतात आणि त्यापैकी ३०% मुंबई आणि पुणे या शहरात राहतात.
४. भारतातील सगळ्यात जास्त पाण्याचे धरण हे महाराष्ट्रा मध्ये आहेत पण दुखद गोष्ट अशी कि बहुतेक धरण हे कोरडे पडलेले आहेत.
५. भारतातील सगळ्यात जास्त किल्ले हे महाराष्ट्रामध्येच आहेत, ज्यासाठी आम्ही शिवाजी महाराजांचे आभारी आहोत कारण त्यांनी ३०० हून अधिक किल्ले महाराष्ट्रात बांधले आहेत.
६. मुंबईमध्ये दररोज  बसने आणि रेल्वेने ७५ लाख लोक प्रवास करतात म्हणजे जवळजवळ स्विट्झर्लँड देशाची जेवढी लोकसंख्या आहे तितके लोक रोज प्रवास करतात.
७. महाराष्ट्राला हिंदी चित्रपटांचा केंद्र म्हणतात. बहुतेक चित्रपट तारे मुंबई मध्येच राहतात.
८. शिवाजी महाराजांनीच महाराष्ट्रातील पहिल्या नेव्ही पथकाची सुरवात केली होती.
९. भारतात सगळ्यात पहिला चित्रपट नाशिक जिल्ह्यातील दादासाहेब फाळके यांनी बनविला होता.
१०. पुणे शहरातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे.
११. महाराष्ट्रातील नवापुर रेल्वे स्थानक अर्धा गुजरातमध्ये आहे आणि अर्धा महाराष्ट्रात आहे.
१२. महाराष्ट्रची सीमा भूतान, स्लोव्हेनिया, स्लोव्हाकिया, मंगोलिया, पनामा, कुवेत, आयर्लंड, ओमान, फिजी, लक्झेंबर्ग अशा अनेक देशांपेक्षा मोठी आहे.
१३. आशियातील सगळ्यात पहिली रेल्वे महाराष्ट्रमध्ये धावली होती, ही रेल्वे १६ एप्रिल १८५३  रोजी मुंबई आणि ठाणे दरम्यान धावली गेली होती.
१४. भारतातील सर्वात मोठे औद्योगिक उत्पादन महाराष्ट्रात आहे, भारतातील एकूण औद्योगिक उत्पादनापैकी २५% एकट्या महाराष्ट्रात होते.
१५. मुंबईमध्ये शेकडो मोठ्या कंपन्या आहेत, जे महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर आणि जगातील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

Published in Dainik Pandhari Bhushan, Solapur. on the occasion of Maharashtra Day. 
(1 May 2019)