आपल्याला भास होतो म्हणजे नेमके काय होते, तर एखादी गोष्ट नसूनही वास्तवात असल्यासारखी वाटती, याच कल्पनेला तंत्रज्ञानापासून साध्य करणे म्हणजे 'ऑगमेंटेड रिऍलिटी' अर्थात 'वाढीव वास्तविकता'. आभासी वास्तविकतेचे पुढचे रूप. वाढीव वास्तविकता वास्तविकजगाच्या वातावरणाचा परस्पर संवादाचा अनुभव आहे , जेथे वास्तविक जगात असणाऱ्या वस्तू संगणकीय व्युत्पन्न माहितीद्वारे "संवर्धित" असतात. कधीकधी अनेक संवेदनात्मक पद्धतींमध्ये दृश्य, आवाज, स्पर्श, संवेदनता यामुळे अधिक वास्तववादी वाटतात.
आच्छादित संवेदनात्मक माहिती रचनात्मक (उदा. नैसर्गिक वातावरणात जोडणी) किंवा विनाशकारी असू शकते आणि भौतिक जगाशी निर्बाधपणे जोडलेली असू शकते जसे की यास आज वास्तविक वातावरणाचा एक मोहक दृष्टीकोन मानला जातो. एक प्रकारचा गॉगल घातल्यानंतर खर्या घरामध्ये अचानक खोटे जंगल दिसू लागतं, जंगलात प्राणी असल्याचं भासू लागत आणि आपण त्याच्यात रमू लागतो किंवा एखाद्या खऱ्या रस्त्यावर गेलो आणि तिथून त्या गॉगलमधून पाहिल्यावर तिथं खोट्या गाड्या धावताना दिसतात म्हणजेच ऑगमेंटेड रिअॅलिटी.
प्रगत ए. आर. तंत्रज्ञानाच्या मदतीने वापरकर्त्याच्या आसपासच्या वास्तविक जगाची माहिती परस्परसंवादी आणि डिजिटलरित्या हाताळण्यायोग्य बनवणे हे केवळ मनोरंजनासाठीचे उद्दिष्ठ होते. १९९२च्या सुरुवातीच्या काळात अमेरिकेत वायुसेनाच्या आर्मस्ट्रांग प्रयोगशाळेत विकसित 'व्हर्च्युअल फिक्स्चर सिस्टम' (आभासी गुणधर्मीय यंत्रणा)च्या अनुषंगाने संशोधन झाले. प्रथम १९९० साली ही संकल्पना मांडली गेली.
आज आपण अशी अनेक उदाहरणे पाहू शकतो जसे की AR सिनेमा, AR गेम. २०१६ मध्ये पोकेमॉन गो या गेम खूप धुमाकूळ घातला. ऑप्टिकल प्रोजेक्शन सिस्टम, मॉनिटर्स, आधुनिक कॅमेरे , इतर वास्तविकतेची भर घालणारी इतर उपकरणे आणि मानवी शरीरावर असलेल्या दृश्य यंत्रणेसह, वाढीव वास्तविकता प्रस्तुतीकरता विविध तंत्रज्ञानांचा वापर केला जातो. वाढीव वास्तविकतेचा प्राथमिक मूल्य हा आहे, की डिजिटल जगाच्या घटकांना वास्तविक जगाच्या एखाद्या व्यक्तीच्या संकल्पनेत आणणे आणि डेटाचे साधे प्रदर्शन करणे. अर्थात हे तंत्रज्ञान आता मोबाईल फोनही वापरून शक्य होत आहे.
करिअर म्हणूनसुद्धा हा एक नवा पर्याय पुढं आला आहे. ऍनिमेशनच्या कोर्सेसप्रमाणेच यामध्ये अनेक पर्याय आहेत. थ्री-डी प्रोफेशनल, ऑगमेंटेड रिऍलिटी डेव्हलपर, युनिटी डेव्हलपर, टेक्निकल आर्किटेक्ट ए. आर. , ए. आर. डिझाईनर अशा जागांसाठी अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी नोकऱ्या उपलब्ध आहेत. याचे ट्रेनींग ऍनिमेशन उपलब्ध असणाऱ्या अनेक खाजगी इनस्टीट्युटमध्ये तसेच ऑनलाईनसुद्धा उपलब्ध आहे. अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये ऑगमेंटेड रिऍलिटीच्या कौशल्यधारकांना चांगले पॅकेज मिळते.