आजचे चलन हे आपल्या कामाचे मूल्यमापन करणारे साधन आहे. चलन वापरात येण्यापूर्वी मनुष्य आपल्या उत्पादनाची देवाणघेवाण करून काम करत होता. काही गोष्टी खरेदी करण्यासाठी वस्तूंचा वापर केला जात असे. उदा. प्राणी ,भाज्या, धान्य इत्यादी. इ. स. ६०० सालामध्ये पहिल्यांदा तुर्कस्तानमधील लिडिया प्रांतातील बादशाह एलीट्सने चलन वापरले होते. सुमारे ३००० वर्षांपासून पैसा मानवी इतिहासचा एक भाग आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक राष्ट्र स्वतःचे चलन वापरतो आहे. जागतिक पातळीवर प्रत्येक चलनाचे मूल्य ठरलेले आहे. आजच्या नोटा, नाणी हे केवळ माध्यम आहे. जुन्या काळी बँकात खात्यावरची सर्व रक्कम ही कागदावर नोंदवहीत नोंदवलेली असत, पुढे कॉम्पुटर आणि इंटरनेटने चित्र बदलले आणि हेच चलन आता बदलणाऱ्या जगाबरोबर डिजिटल होत चालले आहे. जसजसा इंटरनेटचा वापर वाढत आहे, तसतसे मोठ्या आर्थिक व्यवहाराबरोबर किरकोळ आर्थिक व्यवहारदेखील ऑनलाईन होत आहेत. सध्या सर्व प्रकारचा हिशोब हा कॉम्पुटरवर, मोबाईलवर होतो. पेटीएम, भीम, गूगल-पे अशा मोबाईल ऍप्पच्या वापराचे प्रमाण वाढत आहे.
जेव्हा आपण आपल्या देशाचे चलन एखाद्या दुसऱ्या देशाच्या चलनामध्ये रुपांतरीत करत असतो, तेव्हा चलन बदलाचा जो दर असतो, तो जगाच्या तुलनेत आपल्या देशाच्या आर्थिक परिस्थितीशी धरून असतो. सध्या 'डिजिटल चलन' म्हणून एक प्रकारचे नवीन चलन उपलब्ध आहे. हे भौतिक चलनांप्रमाणेच सर्व गुणधर्म दर्शविते, परंतु ते तात्काळ व्यवहार आणि अमर्यादित हस्तांतरण मालकीची परवानगी देऊ शकत नाही.
इथं असं एक उदाहरण देता येईल, ते म्हणजे बिटकॉईनचं! बिटकॉईनवर सामान्य माणसाचे नियंत्रण नसते, त्यासाठी इंटरनेटवर सयंभू संगणकीय जाळे असते. अर्थात याचा कोणी मालक नाही म्हणजेच कोणालाही या जाळ्यात प्रवेश करता येतो. कोणीही बिटकॉईनचा व्यवहार करू शकतो, विकू शकतो, खरेदी करू शकतो आणि त्याला हवे तेव्हा यातून बाहेरही पडता येते. आजच्या पेटीएम, भीम ऍप्पप्रमाणे याचाही क्यूआर कोड असतो. व्यवहारासाठी एक पब्लिक कोड आणि प्रायव्हेट कोड असतो. यात नवीन बिटकॉइन जिंकण्यासाठी नेटवर्कवरील संगणक संगणकीय रेसमध्ये भाग घेतात, ज्या प्रक्रियेला बिटकॉईन मायनिंग ( बिटकॉईन खाण) म्हणतात. बीटकॉईनद्वारे केले जाणारे सर्व व्यवहार ब्लॉक नावाच्या फाईलमध्ये नोंदवले जातात आणी इंटरनेटवर कोणीही हे ब्लॉक पाहू शकतात. सर्व ब्लॉक एका शृंखलेत जोडलेले असतात, कोणताही व्यवहार घडल्यावर सर्वसाधारणतः ६ ब्लॉक्समध्ये नोंद झाल्याशिवाय तो व्यवहार प्रलंबित ठेवण्यात येतो. सध्या इंटरनेटवर २,९०,००० ब्लॉक्स आहेत, ज्यात दर १० मिनिटांनी भर पडत आहे. संबंधित सॉफ्टवेअरवरून आपण हे व्यवहार करू शकतो. या सॉफ्टवेअरसाठी कसलीही रक्कम द्यावी लागत नाही. सध्या या चलनाला अधिकृत मान्यता जरी नसली, तरी देशांतर्गत चलनामध्ये याला रुपांतरीत करता येते, म्हणजेच हे एक आभासी चलन आहे.
बिटकॉइनची किंमत ही खुल्या बाजारावर आणि नेटवर्कमध्ये सहभागी होणाऱ्या संगणकांवर म्हणजेच ब्लॉकचेनवर अवलंबून असते. सुरुवातीला बिटकॉइनची किंमत हिस्सेदारांच्याच मतांवर ठरवलेली होती आणि ती पुढे वाढत गेली. भारतीय रुपयांमध्ये सध्या बिटकॉइनची किंमत २ लाख ७५ हजार इतकी आहे. सांकेतिक भाषेबद्दल आपल्याला माहिती असेल, अगदी आपण जशी गंमत म्हणून 'स'ची भाषा, 'र'ची, 'फ'ची भाषा वगैरे बोलत असतो. अशाच सांकेतिक भाषेचे सध्याचे आधुनिक रूप म्हणजे ब्लॉकचेन. थोडक्यात, सांकेतिक भाषेत माहितीची साठवण आणि देवाण-घेवाण! सध्या डिजिटल चलन म्हणून बिटकॉइनसारख्या 'क्रिप्टोकरन्सी' आणि एका शेअर मार्केटसारख्या करन्सीपर्यंत सगळीकडे या एनक्रिप्शन बद्दलचा वापर आणि कुतूहल वाढत आहे. अर्थात जगभरात बिटकॉइनसारख्या बऱ्याच डिजिटल चलनांचा जोर वाढत आहे. डिजिटल चलन या कल्पनेच्या केंद्रस्थानी 'इन्क्रिप्शन' आणि 'डिक्रिप्शन' या तांत्रिक संकप्लना दडलेल्या आहेत, म्हणजेच ही एक बिटकॉइन सुरक्षित ठेवण्यासाठीची ही संगणकीय प्रकिया आहे. बिटकॉईन, लाईटकॉईन, नेमकॉईन, पीअरकॉईन, ग्रीडकॉईन, डॅश, एनईओ, इथिरिम क्लासिक अशी अनेक डिजिटल चलनं ही क्रिप्टोकरन्सीमध्ये मोडतात म्हणजेच ब्लॉकचेन या प्रक्रियेतूनच याचे मूल्य ठरते. ही सर्व चलनं २००९ पासून ऑनलाईन व्यवहारात आलेली आहेत, तर बिंज, ई-गोल्ड, रँड आणि वेन हे सर्व विना-क्रिप्टोकरन्सीमध्ये मोडतात.
थोडक्यात आपण असे म्हणून शकतो कि आभासी चलनासाठी इंटरनेटवरची एक प्रकारची आभासी अर्थव्यवस्थाही आहे जी आपल्या प्रत्यक्षातल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करते. परकीय चलनाप्रमाणे काही आभासी वस्तू या नवीन शोधलेल्या गेलेल्या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात विकल्याही जातात आणि यात शेकडो कंपन्या मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाल्या आहेत. जसे कि गेम्स, खरेदी-विक्रीच्या सेवा, अशाच इतर काही सेवा आणि शेअर मार्केटचाही यावर परिणाम होत आहे. अमेरिकेसारख्या देशाने अशा आभासी अर्थव्यवस्थेसाठी अनेक आर्थिक धोरणं आखलेली आहेत. यातील गुन्ह्यांकरता काही नवीन कायदेही अमलांत आणले आहेत. या आभासी अर्थव्यवस्थेतील गुन्ह्यांबद्दल जागृतीसाठी सरकारकडून वेळोवेळी अवाहनही केले जाते. जेव्हा आभासी चलनाचे रुपातंर राष्ट्रीय अधिकृत चलनात होते तेव्हा काही देशांत नियमाप्रमाणे याचा करही भरवा लागतो.
भविष्यात डिजिटल साक्षर आणि सुज्ञ नागरिकच याचे व्यवहार करत राहतील, अर्थात पुढे याचा वेगही वाढेल. आजच्या अनेक आर्थिक तज्ञाच्या मते, डिजिटल चलनाचा भाव एक दिवस नक्की ढासळणार आहे, म्हणून त्यापासून लांबच राहिलेलं बरं! अनेक देशांत याला अधिकृत मान्यता मिळालेली नाही. कॅशलेस व्यवहारासाठी भविष्यात अनेक कल्पना पुढे येतील. जुनी चलनही बदलत राहतील परंतु सर्वसामान्य नागरिकांचा विचार करता आजच्या भौतिक नोटा, नाणी कायमस्वरूपी राहतील, हे नक्की!
Published in Masik Adhunik Sarthi, Solapur. May 2019.
Published in Dainik Pudhari on 17 May 2019.