१९९४ मध्ये जेफने डी. ई. शॉ. कंपनीच्या उपाध्यक्ष पदाची नोकरी सोडली. त्याने वॉशिंग्टनला जाऊन पुढील व्यवसायाचा प्लॅन आखला. ५ जुलै १९९४ रोजी जेफने सुरुवातीला वॉशिंग्टनमध्ये कॅडबरा या कंपनीची स्थापना केली. इंटरनेट आणि कॅडबराच्या माध्यमातून केवळ पुस्तके विकण्याचा विचार त्याच्या मनात घोळत होता. सुरुवातीच्या काही दिवसांत, कंपनी बेल्वे, वॉशिंग्टन मधील जेफच्या घराच्या गॅरेजमधून चालविण्यात आली. सप्टेंबर १९९४ मध्ये बेझोसने 'रिलेन्टलेस डॉट कॉम' डोमेन नाव विकत घेतले आणि थोडक्यात त्याच्या ऑनलाइन स्टोअरला उपयुक्त असे नाव देण्याचे विचार झाले. अंतिम नाव ठरवण्यासाठी त्याने अनेक मित्रांना विचारपूस केली. जेफने शब्दकोश शोधून 'अॅमेझॉन' हे नाव निवडले. जगातील सर्वात मोठी नदी असलेली अमेझॉन नदी त्या प्रमाणेच सर्वात मोठे पुस्तकांचे दालन म्हणजे अमेझॉन! अशी त्यामागची युक्ती होती.
इंटरनेटच्या भविष्यातील अनेक प्रमाणात वार्षिक वेब कॉमर्स प्रोजेक्टचा अंदाज लावायचा अहवाल वाचल्यानंतर, बेझोसने २० उत्पादनांची एक यादी तयार केली, जी ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध केली जाऊ शकते. सी. डी. कॉम्पुटर हार्डवेअर, कॉम्पुटर सॉफ्टवेअर, व्हिडिओ आणि पुस्तके यासारख्या पाच सर्वात आश्वासक उत्पादनांची यादी त्यांनी संकलित केली. शेवटी पुस्तक विक्रीपासून सुरुवात करण्याचा निर्णय अंतिम झाला. जेफच्या पालकांनी स्टार्टअपमध्ये सुमारे २५०००० डॉलर्स गुंतविले. जुलै १९९५ मध्ये कंपनीने ऑनलाइन बुक स्टोअर म्हणून सेवा सुरू केली. 'अॅमेझॉन डॉट कॉम' वर विकली जाणारे पहिले पुस्तक 'डग्लस होफास्टास्टरज फ्लुइड कॉन्सेप्ट्स अँड क्रिएटिव्ह अपॉलॉजीज' होते. हे पुस्तक कॉम्पुटर थिअरीशी संबंधित होते. व्यवसायाच्या पहिल्या दोन महिन्यांमध्येच अॅमेझॉनने आसपासच्या ५० राज्यात आणि ४५पेक्षा जास्त देशांत अनेक पुस्तके विकले.
दोन महिन्यांच्या आत अॅमेझॉनची विक्री २०००० अमेरिकन डॉलर्स प्रतिआठवडाप्रमाणे अशी कमाई केली. ऑक्टोबर १९९५मध्ये कंपनीने स्वतःला पब्लिक कंपनीच्या यादीत गेल्याचे जाहीर केले. अॅमेझॉन आणि डेलवेअर कंपन्यात मिलनाचा करार झाला. यासाठी अॅमेझॉनने १५ मे १९९७ रोजी १८ डॉलर प्रतिशेअरवर त्याची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर जारी केली होती. १९९५ मध्ये अॅमेझॉनने प्रथम प्रकाशन क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. द न्यू यॉर्कर या वृत्तपत्राच्या मते, अॅमेझॉनकडून "सिलेक्टेड विथ नो अपिअरन्ट थॉट्स" पुस्तक प्रकाशित झाले. पुढे काही कारणास्तव अॅमेझॉनचा प्रकाशनाचा व्यवसाय बंद पडला. १९९९ मध्ये टाईम मॅगझिनने जेफ बेझॉसला 'द पर्सन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान केला जेव्हा ऑनलाइन शॉपिंग लोकप्रियतेत कंपनीच्या यशास मान्यता मिळाली होती.
१९ जून २००० मध्ये अॅमेझॉन कंपनीचे रीब्रॅण्डिंग झाले आणि नवीन लोगोमध्ये अमेझॉनच्या स्पेलिंगमध्ये A पासून Z पर्यंत एक बाण देण्यात आला. अॅमेझॉन या A पासून Z पर्यंत उपयुक्त वस्तूची ऑनलाईन विक्री करू लागली होती असा त्याचा अर्थ होता. खरे तर या तुलनात्मकदृष्ट्या मंद वाढीमुळे शेअरधारकांनी तक्रार होत असते की कंपनी त्यांच्या गुंतवणूकीला न्याय देण्यासाठी किंवा दीर्घ काळापर्यंत जगण्यासाठी पुरेसे नफा मिळवत नाही. पण अॅमेझॉन वाढत होती आणि टेक क्रॅशच्या पलीकडे पुढे जाऊन ऑनलाइन विक्रीमध्ये एक मोठी कंपनी बनत होती. २००१च्या चौथ्या तिमाहीत कंपनीने कमावलेला पहिला नफा ५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतका होता. २००१ ते २०१० अॅमेझॉन या कालावधीत जगभरात वाढत होती. नफ्यात भरभराटीच्या वाढ होत होती. या कालावधीत वाहतुकीच्या अनेक कंपन्यांशी करार झाले ज्यामुळे ग्राहकांपर्यंत वस्तू पोहचवणे सोपे झाले होते.
२०११ मध्ये अॅमेझॉनमध्ये अमेरिकेतील ३०००० पूर्ण-वेळ कर्मचारी होते आणि २०१६ च्या शेवटी १८०००० कर्मचारी होते. जून २०१७मध्ये अॅमेझॉनने घोषित केले की ते १३.४ दशलक्ष डॉलर्सच्या ४०० गोडाऊनसह होल फूड, एक भली मोठी बाजारपेठच विकत घेतली. ई -व्यापार क्षेत्रात काम करणाऱ्या वॉलमार्ट कंपनीसाठी अॅमेझॉन एक स्पर्धक म्हणून उभी राहिली. न्यू यॉर्क, क्रिस्टल सिटी येथे दुसरे कार्यालय बांधण्याचा निर्णय झाला. २०१७ च्या शेवटी, अॅमेझॉनमध्ये जगभरात ५६६००० कर्मचारी होते.
सध्याच्या घडीला अॅमेझॉनमध्ये ६१३३०० इतके कर्मचारी काम करतात आणि २, ३२,८८७ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी किमतीची आहे. ई-व्यापाराबरोबरच २०१८-२०१९मध्ये अॅमेझॉन-प्राईम, अॅमेझॉन-गो, अॅमेझॉन-फोर स्टार अशाही सेवा अॅमेझॉन आज पुरवत आहे. तंत्रज्ञान म्हणून सुद्धा अनेक संकल्पना, थिअरी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आणल्या आहेत.