Search in Google

Monday, September 20, 2021

क्रांती तंत्रज्ञानाची - अपंगाना आधार कृत्रिम बुद्धिमत्तेचा !

अपंगाना आधार कृत्रिम बुद्धिमत्तेचा !

नव्या तंत्रज्ञानाचे फायदे व तोटे :


भविष्यात तंत्रज्ञानामुळे कोणते बदल होतील हे तंतोतंत सांगणे आज तसे कठीणच आहे. परंतु, आजवर जितके संशोधन झाले आहे, हे भविष्यतील संशोधनाचा विचार करता अगदी किरकोळ म्हणावे लागेल. आजचे संशोधन आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळाला ज्या प्रकारे घेऊन जात आहे ते भविष्यात होणाऱ्या आमूलाग्र बदलांबद्दल विचार करायला भाग पाडत आहे.   पुढे वेगवेगळे आणि भरपूर असे तंत्रज्ञान समोर येत राहणार आहे किंबहुना त्याचे दुष्परिणामही असतील! परंतु त्यांचे फायदे विलक्षण असणार आहेत. त्यातला एक फायदा म्हणजे अपंग लोकांना आधार असेल आर्टिफिशिअल इंटीलिजन्सचा अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा!


कशी होईल मदत :

आर्टिफिशिअल इंटीलिजन्स आज स्वयंचलित मोटारगाडीपासून ते श्रवणयंत्रांपर्यंत अपंग व्यक्तींसाठी दारे उघडत आहे आणि येत्या काही वर्षांत, आर्टिफिशिअल इंटीलिजन्स अनेक नवीन प्रयत्नांसह आणि विस्तारित प्रवेशासह अनेक क्षेत्रात त्रुटींना दूर करत सुपरचार्ज करण्यास नवीन सुरवात करेल. २०११ च्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, जगभरात एक अब्जहुन अधिक अपंग लोक आहेत. 


कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अपंगांच्या बाबतीत, प्रत्येक बदल अधिक समावेशक असेल आणि हा बदल म्हणजे वैद्यकीय तंत्रज्ञानामध्ये मोठी प्रगती करेल आणि लोकांनी जी कल्पनाही केली नसेल अशा प्रकारे स्वातंत्र्य मिळविण्यात अधिक लोकांना मदत करेल. अलेक्झांडर ग्रॅहम बेलची आई बहिरे होती आणि दूरध्वनीचा त्यांचा शोध हा त्याच्या कर्णबधिर समुदायाबरोबरच झाला होता.


बाकीच्या तांत्रिक सुलभतेबरोबरच अपंग लोक हेही कृत्रिम बुद्धिमत्तेचे लक्ष आहे.  मायक्रोसॉफ्टची मुख्य प्रवेशिका अधिकारी जेनी-ली-फ्लोरी म्हणते, की "आम्ही अपंगासाठी खूप काही नाविन्यपूर्ण बदल घेऊन येत आहोत, तुम्हाला अपंग व्यक्ती कोणत्याही दृष्टिटकोनातून अपंग वाटणार नाहीत, या अनुषंगाने मायक्रोसॉफ्टचे काम चालू आहे".  जेनी-ली-फ्लोरी जी स्वतः बहिरी आहे . 


पुढे ती सांगते "दृष्टी, श्रवणक्षमता, मानसिक आरोग्य, शिक्षण, आकलन किंवा एखाद्याच्या गतिशीलतेशी संबंधित अपंगत्व कायमस्वरुपी, तात्पुरते किंवा परिस्थितीजन्य देखील असू शकते. तंत्रज्ञानाच्या प्रत्येकासाठी कार्य करते, हे सुनिश्चित करण्यासाठी अनेक स्तरांवर क्षमता असलेल्या नवीन उत्पादनांची रचना - सर्वसमावेशक डिझाइन करणे, अशी संकल्पना मायक्रोसॉफ्टकडे आहे."  मग हे उत्पादक वापरकर्ते मुके असतील, बहिरे असतील किंबहुना अंधही असतील. जेव्हा अपंग व्यक्ती अशी उपकरणे डोक्याला लावेन तेव्हा, तो जे विचार करेल ते प्रत्येक्षात आणण्यासाठी उपकरण वापरकर्त्याकडून मंजुरीही घेईन. उदा. एखाद्या हात नसलेल्या अपंग व्यक्तीला कॉम्पुटर बंद करायचा असल्यास त्याने केवळ विचार केला तरी कॉम्पुटर बंद होईल किंवा  अंध व्यक्तीच्या मेंदूला कॅमराकडून  उपकरणद्वारे दृश्य पाठवले जाईल. बहिऱ्या व्यक्तीच्या मेंदूला उपकरणद्वारे आवाजाचे सिग्नल्स पाठवले जातील.


कृत्रिम बुद्धिमत्ता artificial intelligence तंत्रज्ञान
"मेंदूला सिग्नल्स पोहोचणारे मज्जातंतू (न्यूरॉन्स ) जरी काम करत नसतील तरी डोक्याला ऍनोड-कॅथोड अशा इलेकट्रोडची उपकरणे लावून ही संकल्पना प्रत्येक्षात उतरवली जात आहे. मनुष्यच्या ज्ञानेंद्रियांकडून मेंदूकडे पाठवणारे सिग्नल्स कृत्रिमपद्धतीने पाठवणे शक्य आहे."

 

वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे भारतीय  न्यूरोइंजिनेसर राजेश राव यांनी ब्रेन-कॉम्प्यूटर इंटरफेसचे काम केले आहे, जे यंत्र किंवा संगणकास कार्ये करण्यास सक्षम करण्यासाठी उपकरणे शोधू शकतील आणि मेंदूच्या सिग्नल्स देवाण-घेवा करण्यावर नजर ठेवू शकतील. व्हिडिओ गेम्स खेळण्यापासून अपंगाचे कृत्रिम हात नियंत्रित करू शकतील. मनुष्याचा मेंदू आणि इलेकट्रोनिक उपकरणे यांच्यात संपर्क होण्याच्या आणि प्रत्येक्षात आणलेल्या या संकल्पनेला  "मिस्ट्री ऑफ द ब्रेन" नाव दिले आहे.  काही दिवसापूर्वीच एका पत्रकारितेतील एका चिनी कंपनीने न्यूज एंकर म्हणून एक रोबोटही वापरला होता.  


राष्ट्रय आपत्ती आणि तंत्रज्ञानाची भमिका : 

आर्टिफिशिअल इंटीलिजन्स  अपंगत्व दूर करेल असे वाटत असले, तरी प्रत्येक राष्ट्रासमोर नैसर्गिक अपंगत्व दूर करण्याचे आवाहन असणारच आहे. जास्त तीव्रतेचे सिग्नल्स असल्यास त्याने कॅन्सरसारखे आजार उद्भवतात.  आजवर पाहिलेल्या तंत्रज्ञानाच्या दोन्ही बाजूंचा विचार करता याचा खर्च आणि समोर आलेले असे दुष्परिणाम याचेही आवाहन संशोधकांपुढे असणार आहे. आधुनिक तंत्रज्ञांचा वाढत जोर पाहता अशा  सर्व समस्यांवर मात करण्याचे संशॊधन होऊन अपंगांना आर्टिफिशिअल इंटीलिजन्सचा आधार असेल, हा विश्वास दृढ होत आहे.  


गणेश आटकळे

This article is published in Dainik Pudhari Newspaper in Sept 2019