आज तीन वर्षे होतील औंधमधल्या त्या जुन्या
ऑफिसला! एम्पलॉयी वाढायला लागलेत म्हणून मागच्याच महिन्यात मी मगरपट्ट्यात
हजार स्क्वेअर फुटच ऑफिस घेतलं. माझी ओनर आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून
खूप धावपळ होतेय. ही धावपळ कंपनी चालू केल्यापासूनच आहे! सध्याच्या घडीला
हेडकाउंट सत्तरच्या आसपास आहे. वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीवर बारा प्रोजेक्ट्स
चालू आहेत. मागच्या सोमवारीच ऐंशी हजार डॉलर्सचा एक नवीन प्रोजेक्ट आला,
खरं म्हणजे आज येणार आहे. आज मी ऑफिसमध्ये जरा नेहमीपेक्षा लवकरच आलोय. आमचा
एक बी.ए. आणि सेल्स मॅनेजर क्लाईंटला रिसीव्ह करायला एअर पोर्टवर गेलेत.
सी.एम.एम. लेवल फाइव्ह अमेरिकन कंपनी टेक्नोहटशी नवीन प्रोजेक्टबद्दल चर्चा
झाली होती. टेक्नोहटकडून आलेले मॅनेजिंग डिरेक्टर डंकन आणि रॉजर यांना
आमचे बीए आणि सेल्स मॅनेजर कंपनीच्या गाडीत घेवून आले. ते आल्यावर अगदी
भारतीय पद्धतीने दोघांचे ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांनी स्वागत केले. ऑफिस पाहून
दोघेही जाम खुष झाले. त्यांची एडमिन टीमने आजच्या रात्रीची रहायची सोय जे
डब्ल्यू मेरिओट हॉटेलमध्ये केली होती. दोघे ऑफिसमध्ये आल्यानंतर काही
वेळातच कॉन्फरन्स रूममध्ये प्रोजेक्टच्या रिक्वायरमेन्टबद्द्ल पुन्हा एकदा
बराच वेळ चर्चा झाली, इस्टिमेशन काढले, ते मंजूरही झाले. काही अटी मान्य
झाल्या, काही झाल्या नाहीत. आमच्या मॅनेजरकडून प्रोजेक्ट डिलिव्हरीची डेट
दिली. डंकन आणि रॉजरने प्रपोजल पुन्हा वाचून पाहिले. आमची लीगल टीम
स्टॅम्पपेपर घेवून तयारच होती. बहात्तर हजार अमेरिकन डॉलर्सला डील फाइनल
झाली. सह्या झाल्यानंतर एमओएमबरोबरच स्टॅम्पपेपर आणि प्रपोजल मेलवर
पाठवायचे ठरले. डंकनची स्टॅम्पपेपरवर सही झाली. सही करण्यासाठी रॉजरने पेन
आणि स्टॅम्पपेपर हातात घेतला आणि ... ...
... आणि मला पलंगावरच डोळा लागला आणि मी कधी झोपी गेलो मला आठवत नाही.
... आणि मला पलंगावरच डोळा लागला आणि मी कधी झोपी गेलो मला आठवत नाही.