मी आवरजुन वाचलेली कादंबरी म्हणजे 'असुरवेद'! सं. दे. सोनवणी लिखित ही एक
थरारक कादंबरी होय. कादंबरी वाचायला घेतली आणि स्वतःला हरवून बसलो, अशी
थराररकता यात जाणवली. अर्थात, मी कोणी समीक्षक नाही, मी एक वाचक म्हणून इथे
बोलत आहे. समाज्याच्या दृष्टीने पाहिले, तर सामजिक प्रश्नावर भूमिका
मांडणारे लेखक फार असतात, परंतु याच समाजकारणी लेखाकातून निवडायचे झाले, तर
कादंबरीकार फार कमी सापडतात. आजचे इतिहासाबद्दलचे वाद, एक उच्च वर्णीय
समाज आणि एक हीन समजला जाणारा समाज अशी तफावत कशासाठी? हे या कथेतून स्पष्ट
झालेले दिसते.
इतिहास हा माणसांनीच घडवला आणि इतिहास लिहिणारादेखील माणूसच होता. इतिहासाचे झालेले लिखाण हे एका विशिष्ठ समाजाने स्व:हिताच्या दृष्टीकोनातून केले, इतिहासात झालेली घुसखोरी, आणि इतिहासाच्या संशोधनात आलेले वेगवेगळे प्रसंग हे या कादंबरीची थरारकता वाढवतात. ही थरारकता जशी पडद्यावर दिसते, तसेच चित्र आपल्या नजरेसमोर उभे राहू लागते. इतिहास संशोधनात झालेली पळवापळवी, आणि जणू इतिहासाचच जणू लिलाव वैदिक लोकानी कसा केला, हे लेखकांनी कथात्मक मांडले आहे. शैव धर्माचा ऱ्हास, हिंदू धर्म, ब्राह्मणी कल्पणा, सिंधू संस्कृती, मुर्तीपुजकांचा समाज या सर्व गोष्टींवर एका रहस्यमय नजरेतून प्रकाश टाकला आहे. यातून कादम्बरीतील पात्रे थाराररकतेची रंगत वाढवतात, दोन-तीन प्रसंग तर इतक्या रमणीय टोकाला घेवून जातात, कि आपल्या स्व:तालाच कथेचे एक पत्र व्हावासे वाटून, कथेत झेप घेवून पुढील रहस्यांचे उलघढे काय आहेत, ते जाणून घ्यावेसे वाटते. अर्थात कथेत पुढे काय आहे? ही जाणून घेण्याची उत्कंठा शेवटपर्यंत ताणून धरली आहे.
वेद फ़क्त चार नव्हेत, तर त्या काळी असुरवेद, पिशाच्चवेद, गन्धर्ववेद आणि सर्पवेद असे अजुनही वेद होते, असे आपल्याला गोपथ ब्राह्मणावरुन कळते. उपनिशदांपैकी मुख्य ५२ उपनिषदे अथर्ववेदांवर आधारीत आहेत आणि त्यात आत्म्याचे अजरामरत्व, त्यागाची महत्ता, योग आणि अद्वैताची महती गायली गेली आहे. हे इथे स्पष्ट होते. हे नमूद करताना लेखकाने संशोधनात कशी घुसखोरी होते, त्याचे थरारक नाट्य आपल्या डोळ्याच्या पडद्यासमोर उभा केले आहे आणि वाचकांना यावर चिंतनही करायले लावले आहे, हे कादंबरीचे सर्वात मोठे यश आहे.