एक ८० वर्षाचा म्हातारा समुद्राच्या किनारी राहत होता. त्याच्या गावात त्याला खूप प्रतिष्ठा होती. आपलं छोटंसं घर आणि छोटीशी शेती यावर तो जाम खुश होता. तो दररोज शेतातील काम करत असे आणि त्यावर आपला उदरनिर्वाह करत असे , परंतू समुद्राला हे पहावत नव्हत. समुद्राला आपल्या विशालतेवर खूप गर्व होता.
एके दिवशी समुद्र त्या महाशयांना म्हणाला "तू स्वतःला खूप कर्तुत्ववान समजतोस का रे? या गावावर अधिराज्य करण्याचा अधिकार माझा आहे आणि इतकंच काय ? या जगावरदेखील अधिराज्य करण्याचा अधिकार माझा आहे ! आता मी हे गांव बुडवणार आहे आणि त्याची सुरुवात.... त्याची सुरुवात मी तुझ्यापासून करणार आहे ! मी तुला बुडवनार.. तुझी शेती, तुझं घर.. तुझी प्रत्येक गोष्ट बुडवनार... तुझं कर्तुत्व बुडवनार... तुझं कर्तुत्व बुडवनार... .. मैं समंदर हूं, समंदर ! लौटकर फीर से आऊंगा... हा हा हा.... " असं हसत समुद्र थोडा वेळ शांत झाला ... तो म्हातारा विचार करू लागला
तो घाबरला नाही... खचला नाही, त्या वृद्धाचा अनुभव नेटका होता... त्याच्याकडे कुशल बुद्धिमता होती... तो विचार करू लागला....
दोन दिवसांनी समुद्राला भरती आली.... समुद्र खवळला होता... समुद्र त्या महाशयांकडे आला आणि म्हणाला आता मी तुला बुडवणार... तुझं कर्तृत्व बुडवणार ... तुझी प्रत्येक गोष्ट बुडवनार... इतक्यात ते महाशय आपल्या झोपडीत गेले आणि घरातून एक वाटीभर तेल आणले आणि समुद्रात टाकले... आणि म्हणाले... "बुडवून दाखव!"
- गणेश आटकळे
15-12-2019