Search in Google

Tuesday, January 25, 2011

Engineering च्या चार वर्षात...!

होती ती संगती,
मैत्री हर-एकाच्या मनी,
लहरीगत बोलाया,
वाऱ्याविणा डोलाया,
गवताच्या पतीसह
नाती जपाया शिकलो ,
अन मीपण आता जगायला शिकलो..!

हरलो अधीमधी
पण संकटांशी लढाया शिकलो ,
हसवून तुम्हास यश
मिळवून हसायला शिकलो,
फाटक्या आवाजात का होईना
आता मी गायला शिकलो,
कवीच्या नजरेतून जग बघायला शिकलो,
अन मीपण आता जगायला शिकलो..!

हसता-हसता कुणाच्यातरी
हातावर हात मारायला शिकलो,
चालता-चालता कुणाच्यातरी
खांद्यावर हात टाकायला शिकलो,
दूर होताना तुम्हांपासून
रडायला अन अश्रू  पुसायला शिकलो,
मीपण आता जगायला शिकलो ,
अन मीपण आता जगायला शिकलो ...!,